उन्हाळ्यात दही खाल्यावर शरीराला काय फायदा होतो?
उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे शरीराला थंडावा देते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि हाडे मजबूत करते. तसेच, दही शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
15

Image Credit : Instagram
शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते, दही हे नैसर्गिक कूलिंग एजंट आहे. रोज एक वाटी दही खाल्ल्यास शरीराला गारवा मिळतो आणि ऊष्माघात (Heat Stroke) टाळता येतो.
25
Image Credit : our own
पचनक्रियेस मदत होते
दह्यात असलेले प्रोबायोटिक्स (गुड बॅक्टेरिया) पचन सुधारतात. ऍसिडिटी, अपचन आणि पोटाच्या जळजळीच्या तक्रारी दूर होतात.
35
Image Credit : our own
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
दह्यातील चांगले जिवाणू (Lactobacillus) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. उन्हाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.
45
Image Credit : our own
हाडे आणि दात मजबूत होतात
दही कॅल्शियम आणि फॉस्फरसने भरलेले असते, जे हाडांसाठी उपयुक्त असतात. नियमित दही खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि सांधेदुखी कमी होते.
55
Image Credit : pexels
पाणी कमी होण्याची (डिहायड्रेशन) समस्या टाळते
उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, पण दहीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. ताक किंवा दह्याचा समावेश केल्याने शरीर हायड्रेट राहते.

