कोलेस्ट्रॉल वाढलंय? शरीर आधीच देतंय 'धोक्याचे इशारे', दुर्लक्ष केलं तर मोठा त्रास!
बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबतो. यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
18

Image Credit : instagram
वाढलेलं कोलेस्ट्रॉल; शरीर देतं 'हे' संकेत
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणे वेळीच ओळखा:
28
Image Credit : Getty
डोळ्यांभोवती पिवळसर गाठी येणे
त्वचेखाली कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे पापण्यांवर पिवळ्या रंगाच्या गाठी दिसू शकतात.
38
Image Credit : Getty
पायांमध्ये वेदना होणे
चालताना किंवा पायऱ्या चढताना पायात वेदना किंवा मुंग्या येणे हे कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
48
Image Credit : Getty
हात आणि पाय थंड किंवा सुन्न पडणे
उष्ण हवामानातही हात-पाय थंड पडणे किंवा सुन्न होणे हे कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
58
Image Credit : Getty
सतत चक्कर येणे
वारंवार चक्कर येणे हे देखील काहीवेळा वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
68
Image Credit : Getty
धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास
पायऱ्या चढताना किंवा छोटी-छोटी कामे करताना धाप लागणे हे कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
78
Image Credit : Getty
अति थकवा जाणवणे
चांगली झोप घेऊनही थकवा जाणवणे हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
88
Image Credit : our own
महत्त्वाची सूचना:
वर नमूद केलेली लक्षणे दिसल्यास, स्वतः निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच आजाराची खात्री करा.

