Vivo S50 and S50 Pro Mini Launched : 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 16GB पर्यंत रॅम आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह विवो S50 आणि विवो S50 प्रो मिनी स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाले आहेत.
Vivo S50 and S50 Pro Mini Launched : विवोने आपल्या S-सीरिज अंतर्गत चीनमध्ये विवो S50 आणि विवो S50 प्रो मिनी हे दोन नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले आहेत. हे दोन्ही फोन प्रीमियम सेगमेंटमधील ग्राहकांना लक्ष्य करून बनवण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये अमोलेड डिस्प्ले, लेटेस्ट स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि मोठी बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. विवो S50 मध्ये स्टँडर्ड साइजचा डिस्प्ले आहे, तर प्रो मिनी व्हेरिएंट अधिक कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये सादर करण्यात आला आहे.
विवो S50
विवो S50 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची चीनमध्ये किंमत 2,999 युआन आहे. 12GB + 512GB आणि 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 3,299 युआन आणि 3,399 युआन आहे, तर 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 3,599 युआन आहे.
विवो S50 प्रो मिनीच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 3,699 युआनपासून सुरू होते. 12GB + 512GB मॉडेलची किंमत 3,999 युआन आणि 16GB + 512GB मॉडेलची किंमत 4,299 युआन आहे. हे दोन्ही फोन विवोच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरद्वारे चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, विवो S50 मध्ये 1260x2750 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.59-इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे. तर, विवो S50 प्रो मिनीमध्ये 1216x2640 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.31-इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतात.
बॅटरीच्या बाबतीत, विवो S50 आणि S50 प्रो मिनीमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी आहे. मात्र, कंपनीच्या म्हणण्यानुसार, वायरलेस चार्जिंग सपोर्ट फक्त प्रो मिनी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, जो 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
विवो S50 प्रो मिनी
परफॉर्मन्ससाठी, विवो S50 प्रो मिनीमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट आहे. यात 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज आहे. स्टँडर्ड विवो S50 स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 प्रोसेसरसह येतो. दोन्ही फोनमधील कॅमेरा सेटअप सारखाच आहे. म्हणजेच, 50MP प्रायमरी सोनी सेन्सर, 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि एक अल्ट्रावाइड लेन्स. समोरच्या बाजूला 50MP सेल्फी कॅमेरा देखील मिळतो.


