सार
Vijay Divas 2024 : प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला भारतात मोठ्या उत्साहात विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. जाणून घेऊया विजय दिवसाचा इतिहास आणि महत्व सविस्तर...
Vijay Divas 2024 History and Importance : प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला भारतात विजय दिवसा साजरा केला जातो. खरंतर, याच दिवशी वर्ष 1971 मध्ये भारताने पाकिस्तानच्या विरोधातील युद्धात ऐतिहासिक विजय मिळवला होता. याच विजयामुळे बांग्लादेशाला आपली स्वतंत्र ओखळ मिळाली होती. काही दिवस लढललेल्या या युद्धात भारतीय सशस्र बल आणि बांग्लादेशी मुक्ति वाहिनी यांनी आपले प्राणार्पण केले होते. याच कारणास्तव भारताचा विजय झाला होता. अशातच 16 डिसेंबरला युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक सैनिक आणि नागरिकाला सलाम करण्यासाठी विजय दिवस साजरा केला जातो.
असे सुरू झाले युद्ध
विभाजनानंतर पाकिस्तानातील पूर्व भाग ज्याला आता बांग्लादेश म्हटले जाते त्यामध्ये सांस्कृतिक आणि राजकीय मतभेदामुळे तणाव वाढला होता. पूर्व भागात नरसंहार, बलात्कार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करत पाकिस्तानने सर्व हद्द पार केली होती. याच कारणास्तव 26 मार्च 1971 रोजी पहिल्यांदा तेथील नागरिकांनी स्वातंत्र्याची मागणी केली. पण पाकिस्तानने त्यावर आपला दबदबा कायम ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. अशातच मानवतेसाठी भारताने बांग्लादेशाच्या स्वतंत्रता संग्रामचे समर्थन केले. याचे नंतर पाकिस्तानच्या विरोधातील युद्धात रुपांतर झाले.
पाकिस्तान विरुद्ध भारत युद्ध
3 डिसेंबर 1971 मध्ये भारत-पाकिस्तानच्या युद्धाला सुरुवात होत 13 दिवस चालले. अखेर 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सेना आणि बांग्लादेशी मुक्ति वाहिनीसमोर आत्मसमर्पण केले. या युद्धाला पुर्णविराम देण्यासाठी जवळजवळ 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते, जे इतिहासातील कोणत्याही युद्धातील सर्वाधिक मोठे आत्मसमर्पण मानले जाते. 16 डिसेंबरच्याच संध्याकाळी जनरल नियाजी यांनी आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. यानंतर नियाजी यांनी आपली रिवॉल्वर जनरल अरोडा यांच्याकडे सोपवली होती.
भारताची भूमिका काय होती?
भारत-पाकिस्तान युद्धात भारताने केवळ बांग्लादेशन सैन्याला मदतच केली नव्हती तर लाखोंच्या संख्येने निर्वासितांना आश्रयही दिला होता. हे निर्वासित पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या हिंसाचारातून आपली सुटका करुन आले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वार भारताने निर्णायक भूमिका निभावली होती.
अशातच 16 डिसेंबरचा दिवस भारतीय सैन्याी ताकद आणि कूटनितीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी युद्धातील प्रत्येकाला श्रद्धांजली वाहिली जाते. याशिवाय भारतात ठिकठिकाणी सैन्यांची परेड किंवा श्रद्धांजली समारोहाचे आयोजन केले जाते.
आणखी वाचा :
वर्किंग वुमनसाठी स्पेशल डाएट प्लॅन, 4-5 किलो वजन होईल कमी
थंडीत मेकअप केल्यानंतर त्वचा कोरडी होते? Glow टिकवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स