MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Venus Transit : स्वतःच्या राशीत शुक्राचं कमबॅक... 'या' 8 राशींना नववर्षाआधीच मिळणार श्रीमंतीचा योग

Venus Transit : स्वतःच्या राशीत शुक्राचं कमबॅक... 'या' 8 राशींना नववर्षाआधीच मिळणार श्रीमंतीचा योग

२२ नोव्हेंबरला शुक्र ग्रह तुळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचा हा गोचर काही राशींसाठी भाग्याचं दार उघडण्याची शक्यता आहे.

4 Min read
Author : Karishma R
Published : Nov 13 2026, 02:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
शुक्र गोचराचे फायदे
Image Credit : Chat GPT

शुक्र गोचराचे फायदे

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, वैभव, प्रेम, कला, सौंदर्य आणि कौटुंबिक सुखाचा कारक मानलं जातं. पत्रिकेत शुक्र मजबूत स्थितीत असेल, तर आयुष्यात आर्थिक प्रगती, भौतिक सुख-सुविधा आणि नात्यांमध्ये गोडवा येतो अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे.

सध्या कन्या राशीत असलेला शुक्र, २२ नोव्हेंबर रोजी त्याच्या स्वराशीत म्हणजे तुळ राशीत प्रवेश करत आहे. पंचांगानुसार हा बदल २२ नोव्हेंबरला संध्याकाळी ४:५४ वाजता होईल. १ जानेवारीपर्यंत शुक्र याच राशीत विराजमान असेल.

शुक्राचं स्वतःच्या राशीत जाणं हे ज्योतिषशास्त्रानुसार खूप महत्त्वाचं मानलं जातं. या गोचरामुळे १२ राशींमध्ये काही ना काही बदल नक्की दिसतील. विशेषतः काही राशींसाठी उत्पन्न वाढणं, नवीन नोकरी, व्यवसायात नफा आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मग या शुक्राच्या गोचरामुळे कोणत्या राशींना लॉटरी लागणार आहे आणि काय काय फायदे मिळतील ते आपण पाहूया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
29
मकर
Image Credit : chatgpt

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा गोचर करिअर आणि कामाच्या ठिकाणी नवीन प्रगतीच्या संधी आणू शकतो. तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना योग्य ती ओळख मिळेल. वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने तुम्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडाल.

जे लोक खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. स्वतःचा व्यवसाय करणारे लोक नवीन योजना राबवून आपला बिझनेस वाढवण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याचीही चिन्हं आहेत. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि तुम्ही भविष्यातील ध्येयांसाठी नवीन प्लॅनिंग कराल.

39
वृश्चिक
Image Credit : chatgpt

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा शुक्र गोचर आर्थिकदृष्ट्या खूप आशादायक काळ ठरू शकतो. पैसे कमवण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि खूप दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक अडचणी हळूहळू सुटण्याची शक्यता आहे.

खासकरून परदेशी कंपन्यांशी जोडले गेलेले किंवा आयात-निर्यातीच्या व्यवसायात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. जीवनमान उंचावण्यासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. आर्थिक ताण कमी होऊन, गरजा पूर्ण करण्याइतपत हातात पैसा खेळता राहील.

49
तुळ
Image Credit : chatgpt

तुळ

शुक्र स्वतःच्या तुळ राशीतच प्रवेश करत असल्यामुळे, तुळ राशीच्या लोकांसाठी हा गोचर खूप खास मानला जात आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेलच, सोबतच तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि दिसण्यातही सकारात्मक बदल दिसू शकतात.

कामाच्या ठिकाणी तुमच्या टॅलेंटची दखल घेतली जाईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. जे लोक व्यवसायात आहेत त्यांना नवीन ग्राहक आणि पार्टनर्सच्या मदतीने मोठी प्रगती साधता येईल. इन्कम वाढवण्याच्या नवीन संधी चालून येतील.

वैयक्तिक आयुष्यातही छान बदल होऊ शकतात. प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर होऊन जवळीक वाढेल. लग्नाळू तरुणांना चांगला जोडीदार मिळू शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

59
सिंह
Image Credit : chatgpt

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा राशीबदल त्यांचा आत्मविश्वास आणि काम करण्याची क्षमता वाढवणारा ठरेल. खूप दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरे जाल आणि यशाकडे वाटचाल कराल.

नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. जे आधीच नोकरीत आहेत ते त्यांचं टॅलेंट दाखवून बॉसची शाबासकी मिळवू शकतात. यामुळे ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक जीवन आणि समाजात तुमच्या शब्दाला किंमत मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला असू शकतो.

69
कन्या
Image Credit : chatgpt

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा गोचर आर्थिक आणि कौटुंबिक आयुष्यात चांगले बदल घडवून आणेल. विशेषतः तुम्ही तुमची बोलण्याची पद्धत आणि हुशारी वापरून अनेक महत्त्वाची कामं फत्ते कराल.

कामाच्या ठिकाणी नवीन संधी चालून येतील. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेप्रमाणे नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याचा योग आहे.

तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमची बोलण्याची पद्धत आणि स्वभाव इतरांना आकर्षित करेल. त्याचवेळी, उत्पन्नातील काही भाग सेव्हिंग करण्यावर लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक स्थिरता चांगली राहील.

79
मिथुन
Image Credit : chatgpt

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा शुक्र गोचर नशीब आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. खूप दिवसांपासून अपूर्ण असलेल्या इच्छा एकापाठोपाठ एक पूर्ण होण्याची शक्यता आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या कंपन्यांमधून कॉल येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या संधी निर्माण होतील. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांनाही अपेक्षित यश मिळण्याची चिन्हं आहेत.

व्यावसायिक लोक नवीन गुंतवणूक आणि विस्ताराच्या योजना अमलात आणू शकतात. इन्कम वाढण्यासोबतच घरातील मोठ्यांचे सल्ले आणि पाठिंबा तुमच्या यशासाठी महत्त्वाचा ठरेल.

89
कर्क
Image Credit : chatgpt

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचा तुळ राशीतील प्रवेश घर, गाडी, मालमत्ता आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

ज्यांचे स्वतःचे घर किंवा नवीन गाडी घेण्याचे स्वप्न आहे, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. जमीन खरेदी, घर बांधणी किंवा जुन्या घराचे नूतनीकरण करण्याच्या योजना मार्गी लागू शकतात.

कुटुंबातील आनंद आणि एकता वाढेल. विशेषतः आईसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळे खूप दिवसांपासून आखलेल्या योजना तुम्ही पूर्ण करू शकाल.

99
मेष
Image Credit : chatgpt

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा गोचर वैवाहिक आणि वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येऊ शकतो. जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होऊन, एकमेकांबद्दलची समज आणि प्रेम वाढण्याची शक्यता आहे.

कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर करार मिळतील. नवीन व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल.

तुमचे बोलणे आणि वागण्याची पद्धत अनेकांची मने जिंकेल. आर्थिक बाजू भक्कम होत असल्याने भविष्यातील योजना आत्मविश्वासाने अंमलात आणाल.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Hibiscus Oil : केस निरोगी आणि लांबसडक करण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचं तेल, घरीच असं बनवा
Recommended image2
Rahu Ketu Transit : राहु-केतू गोचर 2026... आजपासून या 3 राशींची चांदी
Recommended image3
Oldest River : हिमालयापेक्षा जुनी नदी, भारताची सर्वांत प्राचीन नदी कोणती?
Recommended image4
Friday The 13th बद्दल या 7 अंधश्रद्धा आणि गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का?
Recommended image5
Indoor Plants : घरात निसर्गाचा स्पर्श! ही ८ इनडोअर झाडं तुमच्या घराचं रूपच पालटून टाकतील
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved