Background Apps सतत चालू राहिल्यामुळे फोन स्लो होतो, बॅटरी लवकर संपते आणि डेटा जास्त वापरला जातो. अशातचे असे अॅप्स बंद कसे करायचे हे जाणून घेऊया.
Background App : स्मार्टफोन वापरताना अनेकांना फोन हळू चालणे, अॅप्स उघडायला वेळ लागणे किंवा बॅटरी पटकन संपणे अशा समस्या जाणवतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे बॅकग्राउंड अॅप्स. आपण एखादं अॅप वापरून बंद केलं तरी ते पूर्णपणे बंद न होता पार्श्वभूमीत (Background) सुरूच राहतं. ही अॅप्स सतत इंटरनेट, RAM आणि प्रोसेसर वापरत राहतात, त्यामुळे फोनची कार्यक्षमता कमी होते. विशेषतः जुने किंवा कमी RAM असलेले फोन याचा जास्त फटका सहन करतात.
Background Apps मुळे फोन स्लो होण्याबरोबरच डेटा जास्त खर्च होतो आणि बॅटरीही लवकर ड्रेन होते. सोशल मीडिया अॅप्स, ई-मेल, गेम्स, शॉपिंग अॅप्स आणि लोकेशनवर चालणारी अॅप्स ही Background मध्ये सर्वाधिक संसाधन वापरतात. अनेकदा आपल्याला याची कल्पनाही नसते. त्यामुळे वेळोवेळी अशा अॅप्स बंद करणे किंवा त्यावर मर्यादा घालणे खूप गरजेचे आहे.

Android फोनमध्ये Background Apps बंद करण्याची पद्धत सोपी आहे. सर्वप्रथम फोनच्या Settings मध्ये जा. त्यानंतर Apps किंवा Apps & Notifications हा पर्याय निवडा. येथे तुम्हाला सर्व अॅप्सची यादी दिसेल. ज्या अॅप्सची गरज कमी आहे, त्या अॅपवर क्लिक करून Force Stop हा पर्याय निवडा. तसेच Battery किंवा Background Usage या सेक्शनमध्ये जाऊन त्या अॅपसाठी Restrict किंवा Limit Background Activity हा पर्याय ऑन करू शकता. यामुळे अॅप्स परवानगीशिवाय Background मध्ये चालणार नाहीत.
iPhone युजर्ससाठी Background Apps नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. iPhone मध्ये Settings → General → Background App Refresh या पर्यायात जा. येथे तुम्ही सर्व अॅप्ससाठी Background App Refresh पूर्णपणे बंद करू शकता किंवा फक्त आवश्यक अॅप्ससाठीच हा पर्याय ऑन ठेवू शकता. तसेच Battery सेक्शनमध्ये जाऊन कोणती अॅप्स जास्त बॅटरी वापरत आहेत ते तपासा. अनावश्यक अॅप्स हटवणे (Uninstall) हाही एक प्रभावी उपाय ठरतो.
Background Apps कंट्रोलमध्ये ठेवल्यास फोनची स्पीड वाढते, बॅटरी लाइफ सुधारते आणि डेटा वापरही कमी होतो. यासोबतच वेळोवेळी फोन रीस्टार्ट करणे, स्टोरेज रिकामं ठेवणे आणि सॉफ्टवेअर अपडेट्स करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. थोडीशी काळजी घेतली, तर कोणताही फोन दीर्घकाळ स्मूथ आणि फास्ट चालू शकतो.


