- Home
- lifestyle
- How To Lower LDL Cholesterol: कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? ‘या’ सवयी ठरतील गेम चेंजर!
How To Lower LDL Cholesterol: कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? ‘या’ सवयी ठरतील गेम चेंजर!
How To Lower LDL Cholesterol: वाढलेले बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) ही आजच्या काळात एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. अनियमित आहार, व्यायामाचा अभाव आणि तणावपूर्ण जीवनशैली हे मुख्य कारण असून, योग्य सवयींनी ते प्रभावीपणे नियंत्रित करता येते.

चुकीची जीवनशैली हे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचे मुख्य कारण आहे
वाढलेले कोलेस्ट्रॉल आज एक सामान्य समस्या बनली आहे. बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे चुकीची जीवनशैली हे मुख्य कारण आहे. काही दैनंदिन सवयी LDL कोलेस्ट्रॉल वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
व्यायामामुळे LDL कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते
व्यायाम केल्याने LDL कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित एरोबिक व्यायाम उपयुक्त ठरतो. आठवड्यातून किमान 150 मिनिटे वेगाने चालणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखे व्यायाम करा.
धूम्रपानामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते
धूम्रपानामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते. धूम्रपानाचा कोलेस्ट्रॉलवर वाईट परिणाम होतो. कारण ते एकूण कोलेस्ट्रॉल, LDL ('बॅड') आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढवते आणि HDL ('गुड') कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.
मद्यपानामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते
मद्यपानामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. जास्त मद्यपान करणे हे बॅड कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि हृदयाशी संबंधित इतर धोक्यांशी जोडलेले आहे.
सॅचुरेटेड फॅट्सचे सेवन कमी केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते
सॅचुरेटेड फॅट्स कमी करा. मुख्यत्वे रेड मीट आणि पूर्ण-फॅट दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारे सॅचुरेटेड फॅट्स एकूण कोलेस्ट्रॉल वाढवतात. सॅचुरेटेड फॅट्सचे सेवन कमी केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते.
ओमेगा-3 फॅटी ॲसिडयुक्त पदार्थ खा
ओमेगा-3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खा. ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा LDL कोलेस्ट्रॉलवर परिणाम होत नाही. पण रक्तदाब कमी करण्यासह हृदयाच्या आरोग्यासाठी त्याचे इतर फायदे आहेत. सॅल्मन, बांगडा, सार्डिन, अक्रोड आणि जवस यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते.
तणावामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे उत्पादन वाढू शकते
तणावामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे उत्पादन वाढू शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, ध्यान, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीद्वारे तणाव नियंत्रित केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

