Relationships : सध्या घटस्फोटांचे प्रमाण वाढत चालले आहे, असे चित्र आहे. अशातच ‘मेनोडिव्होर्स’ची संख्याही वाढत आहे. काय आहे 'मेनोडिव्होर्स'? वाढत्या वयात घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे का? अशा घटस्फोटांमागे मुख्य कारणे कोणती आहेत?
Relationships : आजकाल सोशल नेटवर्क मजबूत होत असतानाच कौटुंबिक नातेसंबंध मात्र नाजूक होत चालले आहेत. एकतर धावपळीच्या जीवनात कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही, त्यातही जो काही थोडाफार वेळ मिळतो, त्यात कुरबुरीच जास्त असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. याचा संपूर्ण कुटुंबावर विपरित परिणाम होतो. हे संबंध एवढे ताणले जातात की, ते थेट कुटुंब न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचतात. हे असे का होते?
'ग्रे डिव्होर्स', 'सायलेंट डिव्होर्स' या शब्दांनंतर, नात्यांमधील एक नवीन संकल्पना म्हणून 'मेनोडिव्होर्स' चर्चेत येत आहे. हा शब्द ४० ते ६० वयोगटातील जोडप्यांमध्ये वाढत्या घटस्फोटाच्या प्रवृत्तीला सूचित करतो. महिलांमधील रजोनिवृत्तीचा काळ (Menopause) म्हणजेच मेनोपॉज त्यांच्या वैवाहिक जीवनात मोठे बदल घडवून आणतो, यालाच 'मेनोडिव्होर्स' म्हणतात.
रजोनिवृत्तीच्या काळात होणारे हार्मोनल बदल महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. या टप्प्यावर, जोडीदारासोबतचे मतभेद तीव्र होतात आणि अनेक वर्षांपासून सहन केलेल्या समस्या आता नकोशा वाटू लागतात, हेच यामागील प्रमुख कारण आहे.
रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी कमी झाल्यामुळे निद्रानाश, मानसिक ताण आणि अचानक राग येणे यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे, अनेक वर्षांपासून वैवाहिक जीवनात सहन केलेल्या गोष्टींमध्ये अचानक बदल घडवण्याची इच्छा निर्माण होते. महिला आपली ओळख पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतात. इतकी वर्षे केवळ एक आई आणि पत्नी म्हणून जगल्यानंतर, त्या स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतात, जे पुरुषांना स्वीकारणे कठीण जाते आणि हे देखील घटस्फोटाचे कारण ठरते.
अनेक दशकांपासून वैवाहिक जीवनात सहन केलेली उपेक्षा किंवा भेदभाव आता सहन करण्याची गरज नाही, ही जाणीव या टप्प्यावर अनेक महिलांमध्ये प्रबळ होते. 'मेनोडिव्होर्स'सारखी परिस्थिती टाळण्यासाठी, जोडप्यांमध्ये परस्पर समंजसपणा आणि काळजी असणे अत्यंत आवश्यक आहे. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांविषयी दोन्ही जोडीदारांना स्पष्ट माहिती असायला हवी.
घरातील जबाबदाऱ्या आणि कामे समान वाटून घेतल्यास या टप्प्यावर महिलांना येणारा मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता वैवाहिक जीवनावर परिणाम करत असल्यास, न लाजता डॉक्टर किंवा समुपदेशकाची मदत घेणे या संकटावर मात करण्यास मदत करू शकते.


