सार
हिंदू धर्मात रथ सप्तमीचे पर्व सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची विधीवत पूर्वपत पूजा केली जाते. अशातच या दिवशी सूर्यदेवाला रथ सप्तमीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात याबद्दल जाणून घेऊया.
Rath Saptami 2025 : हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. येत्या 4 फेब्रुवारीला रथ सप्तमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्यदेवाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असल्यास या दिवशी सूर्याची पूजा-प्रार्थना केल्याने लाभ होऊ शकतो. अशातच रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात याबद्दल जाणून घेऊया.
काळे तीळ
रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्यासह त्याला जल अर्पण करण्याचे विशेष महत्व असते. याशिवाय काळे तीळही सूर्यदेवाला अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. काळ्या तीळाचा सूर्यदेवाची सखोल संबंद आहे. काळ्या तीळाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो असे मानले जाते. याशिवाय काळे तीळ धन-समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
गुळ अर्पण करा
हिंदू धर्मात सूर्यदेवाला गुळ अतिशय प्रिय असल्यासारखे मानले जाते. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात. गुळाला उर्जेचे प्रतीक मानले जाते. सूर्यदेवही उर्जेची देवता आहे. यामुळे गुळ अर्पण केल्याने सूर्यदेवाची उर्जा भक्तांना मिळते. याशिवाय लग्नात कोणत्याही प्रकारची समस्या येत असल्यास रथ सप्तमीवेळी सूर्यदेवाला गुळ नक्की अर्पण करा.
मध
रथ सप्तमीवेळी सूर्यदेवाला मध अर्पण करू शकता. असे म्हटले जाते की, सूर्यदेवाला मध अर्पण केल्यास व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. याशिवाय सुख-सौभाग्यात वृद्धी होते. आरोग्यासंबंधित समस्याही दूर होतात.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :