MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Pithori Amavasya 2024 महत्व, शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजनाची विधी

Pithori Amavasya 2024 महत्व, शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजनाची विधी

Pithori Amavasya 2024 : श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्येच्या नावाने ओखळले जाते. आज (2 सप्टेंबर) पिठोरी अमावस्या आहे. या दिवशी महिला संतान प्राप्तीसह, मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 02 2024, 08:40 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पिठोरी अमावस्या 2024
Image Credit : Facebook

पिठोरी अमावस्या 2024

हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा श्रावण अमावस्याही म्हटले जाते. याशिवाय बैल पोळ्याचा सणही साजरा केला जातो. आज (2 सप्टेंबर) पिठोरी अमावस्या असून त्याचे महत्व, शुभ मुहूर्तासह पूजानाच्या विधीबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पिठोरी अमावस्येचे महत्व
Image Credit : Facebook

पिठोरी अमावस्येचे महत्व

पिठोरी अमावस्येला पिठोरा, पिठोर अशा वेगवेगळ्या नावांनी ओखळले जाते. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. संतान प्राप्तीसाठी महिला पिठोरी अमावस्येला व्रत करतात. हे व्रत केल्याने त्याचे आयुष्यात शुभ परिणाम आणि इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, इंद्राची पत्नी शचीने पिठोरी अमावस्येचे व्रत केले होते. यामुळे संतती प्राप्ती होण्यासह कुटुंबाची समृद्धी झाली.

याशिवाय पिठोरीच्या दिवशी सप्तमातृकांचीही पूजा केली जाते. दक्षिण भारतात सप्तमातृकांच्या पूजेला विशेष महत्व आहे. ब्राम्हणी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमरी, वाराही, चामुंडा किंवा नरसिंही या सप्तमातृका आहेत. यांची पूजा केली जाते.

35
शुभ मुहूर्त
Image Credit : Facebook

शुभ मुहूर्त

  • पिठोरी अमावस्येचा शुभ मुहूर्त प्रारंभ तिथी- 2 सप्टेंबर सकाळी 05 वाजून 21 मिनिटांनी सुरु
  • पिठोरी अमावस्येची तिथी समाप्ती- 3 सप्टेंबर सकाळी 07 वाजून 24 मिनिटांपर्यंत
45
पिठोरी अमावस्येला देवी पार्वतीचे पूजन
Image Credit : Facebook

पिठोरी अमावस्येला देवी पार्वतीचे पूजन

पिठोरी अमावस्येला गर्भवती महिला आपल्या मुलांचे रणक्ष करण्यासाठी उपवास धरतात. याशिवाय संतती प्राप्तीसाठी देवी पार्वतीची पिठोरी दिवशी पूजा केली जाते. पार्वती पूजनावेळी नवे वस्र, दागिने आईला अर्पण करण्याची प्रथा आहे. याशिवाय उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य लाभते आणि घरातील पितरांना सुख-शांती मिळते असे मानले जाते.

55
पिठोरीची पौराणिक कथा
Image Credit : Facebook

पिठोरीची पौराणिक कथा

पिठोरी अमावस्येमागील आणखी एक पौरामिक कथा आहे.यानुसार, विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत.या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले.तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले.पुढे ती पुन्हा घरी आली.विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले.अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठेरी अमावास्या करून देते.म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी

गणपतीची पहिल्यांदाच घरी स्थापना करणार आहात? लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Afternoon Nap : दुपारी झोपल्याने शरीरात नेमके काय बदलते माहितीये?
Recommended image2
Lemon Storage : महिने उलटले तरी लिंबे राहतील एकदम फ्रेश! वाचा टिप्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved