Numerology Marathi June 29 आज रविवारचा दिवस कसा जाईल? अंकशास्त्र भविष्य सांगते
मुंबई - प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे. जाणून घ्या आजचा खास संदर्भ…

अंक १ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात, आज तुम्हाला एखादी शुभ बातमी मिळू शकते. अध्यात्मिक जगाशी संबंधित व्यक्ती भेटू शकते. त्यामुळे तुम्हाला इतरही आध्यात्मिक सहवास लाभेल. तुम्हाला मानसिक सुखसमृद्धी मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बरकत येईल. नवीन कामाची शक्यता आहे. त्यामुळे तुमची तयारी ठेवा.
अंक २ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात, अडकलेल्या कामांना गती येईल. आज घर आणि कुटुंबातील व्यक्तींसोबत आरामात दिवस जाईल. आज कौटुंबीक सहवास एन्जॉय करा. आज आजारपासून सावध राहा. त्यामुळे उघड्यावरचे खाणे टाळा. आज राग आणि भावना नियंत्रणात ठेवा. आज सर्व कामांमध्ये यश मिळेल.
अंक ३ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात, दैनंदिन कामांचे रुटीन तयार करा. अस्ताव्यस्त कामांमुळे कोणत्याही स्वरुपाची प्रगती होणार नाही. आज आरोग्यात चढ-उतार होऊ शकतात. आज करिअरमध्ये प्रगती होईल. एखाद्या राजकीय कामाशी संबंधित व्यक्तीची मदत मिळेल.
अंक ४ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात, अभ्यास आणि करिअरशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. आज व्यवसायाची योजना कोणालाही सांगू नका. आज पती-पत्नीमधील संबंध गोड राहतील. चुकीच्या कामांवर पैसा खर्च होईल. आज जमीन आणि वाहनासाठी कर्ज घेऊ शकाल.
अंक ५ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात, भावना नियंत्रणात ठेवा. तुम्ही भावनिक असला तरी इतरांनी त्याचा लाभ घ्यावा एवढे भाळू नका. आज तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल. आज वैवाहिक संबंध सुखी राहतील. सर्व प्रकारचे वैवाहिक सुख मिळेल. आज राग नियंत्रणात ठेवा.
अंक ६ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात, बुद्धिमत्तेने सर्व निर्णय घ्या. आज व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. पण गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. आंधळ्यापणाने गुंतवणूक करु नका. विद्यार्थी चुकीच्या कामांकडे लक्ष देऊ शकतात. आज कठोर परिश्रमाने दिवस जाईल.
अंक ७ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात, जमीन किंवा वाहन खरेदी करण्यासाठी शुभ योग तयार होईल. आज व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागू शकतात. आज असावधानतेमुळे अडचणीत येऊ शकता. आज कौटुंबिक जीवन सामान्य राहील.
अंक ८ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात, कठोर परिश्रमाने चांगले फळ मिळेल. दिवस चांगला आहे. आज मनोरंजनात दिवस जाईल. आज कोणावरही विश्वास न ठेवणे फायदेशीर ठरेल. राजकीय बाबींमध्ये सावधगिरी बाळगा.
अंक ९ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात, आर्थिक परिस्थिती थोडी मंदावू शकते. वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नवीन गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.

