- Home
- lifestyle
- Numerology Aug 19 : आज मंगळवारचे अंकशास्त्र भविष्य, या अंकाच्या मालमत्तेच्या समस्या दूर होतील!
Numerology Aug 19 : आज मंगळवारचे अंकशास्त्र भविष्य, या अंकाच्या मालमत्तेच्या समस्या दूर होतील!
प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे ते जाणून घ्या.

संख्या १ (जन्म तारीख १, १०, १९, २८)
गणेश म्हणतात, आज बहुतेक कामे वेळेत पूर्ण होतील. दिवसाची सुरुवात नियोजन करून करा. मानसिक व शारीरिक ऊर्जा उत्तम राहील. दाम्पत्य जीवनात जिव्हाळा वाढेल. मित्रांसोबत प्रवासाची शक्यता आहे.
संख्या २ (जन्म तारीख २, ११, २०, २९)
आजचा दिवस आत्मपरीक्षणासाठी योग्य आहे. संयम ठेवा. थकवा जाणवेल पण स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळू शकते. आध्यात्मिक आनंद लाभेल.
संख्या ३ (जन्म तारीख ३, १२, २१, ३०)
घरातील जबाबदाऱ्यांमध्ये दिवस जाईल. व्यवसायात प्रगती होईल. व्यस्ततेचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. विद्यार्थी परीक्षेची तयारी सुरू करू शकतात.
संख्या ४ (जन्म तारीख ४, १३, २२, ३१)
हा दिवस खास ठरेल. व्यावसायिक प्रगती साध्य होईल. विवाहितांच्या नात्यात जवळीक वाढेल. आपल्या योजनेप्रमाणे काम पूर्ण करू शकाल. व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनेल.
संख्या ५ (जन्म तारीख ५, १४, २३)
दिवसाची सुरुवात नियोजनाने करा. आपल्या कार्यक्षमताेवर विश्वास ठेवा. ताण व थकवा जाणवू शकतो. मात्र नोकरी व व्यवसायात उन्नती होईल.
संख्या ६ (जन्म तारीख ६, १५, २४)
भूतकाळातील चुका लक्षात ठेवून त्यातून धडा घ्या. मानसिक ताण संभवतो. शेजारी वा मित्रांसोबत किरकोळ वाद उद्भवू शकतो. तरीही कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
संख्या ७ (जन्म तारीख ७, १६,२५)
मालमत्ता विषयक गुंतागुंतीचे प्रश्न सुटतील. प्रिय व्यक्तीसोबत भेटीची संधी मिळू शकते. बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आपल्या प्रतिभेला वाव देण्याचा प्रयत्न करा.
संख्या ८ (जन्म तारीख ८,१७,२६)
स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. संयमाने प्रत्येक गोष्टीकडे पाहा. मित्रमंडळीसोबत आनंद मिळेल. इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका.
संख्या ९ (जन्म तारीख ९,१८,२७)
सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. वैवाहिक आयुष्य आनंदी राहील. वाहन चालवताना खबरदारी घ्या. घरगुती व व्यावसायिक कामांमध्ये सुधारणा होईल.

