- Home
- lifestyle
- Numerology Aug 1 : आज शुक्रवारचे अंकशास्त्र भविष्य, या राशिच्या लोकांनी पावसाळी आजारांपासून सावध राहावे!
Numerology Aug 1 : आज शुक्रवारचे अंकशास्त्र भविष्य, या राशिच्या लोकांनी पावसाळी आजारांपासून सावध राहावे!
मुंबई - वेगवेगळ्या जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस करिअर, आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा जाईल हे जाणून घ्या. प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्या गणनेनुसार, तुमच्या जन्मतारखेनुसार आजचे तुमचे भविष्य जाणून घ्या .

अंक १ (ज्या कोणत्याही महिन्यात १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्म झालेले)
गणेश म्हणतात, प्रगतीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. अध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित लोकांना एखादी आनंददायक बातमी मिळेल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्दिष्टांमध्ये यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
अंक २ (ज्या कोणत्याही महिन्यात २, ११, २० आणि २९ तारखेला जन्म झालेले)
गणेश म्हणतात, कार्यक्षेत्रात यश मिळेल. आज हंगामी आजारांपासून सावध राहा. स्पर्धेत यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. सर्व कामांमध्ये यश लाभेल.
अंक ३ (ज्या कोणत्याही महिन्यात ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्म झालेले)
गणेश म्हणतात, दिनचर्या योग्य ठेवा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. अभ्यास व करिअरसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. एखाद्या कटकारस्थानाचा बळी ठरू शकता. वाईट संगती टाळा.
अंक ४ (ज्या कोणत्याही महिन्यात ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्म झालेले)
गणेश म्हणतात, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. करिअर संबंधित कामात प्रगती होईल. व्यवसायात गती येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. जमीन आणि वाहन संबंधित कामांमध्ये यश लाभेल.
अंक ५ (ज्या कोणत्याही महिन्यात ५, १४, २३ तारखेला जन्म झालेले)
गणेश म्हणतात, आरोग्यात सुधारणा होईल. एखादी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नातेवाइकांकडून चांगली बातमी मिळेल. दिवस आनंदात जाईल. आर्थिक बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. वैवाहिक नातेसंबंध सुखद राहतील. भावना नियंत्रणात ठेवा.
अंक ६ (ज्या कोणत्याही महिन्यात ६, १५ आणि २४ तारखेला जन्म झालेले)
गणेश म्हणतात, निर्णय घेण्यासाठी बुध्दीचा वापर करा. पती-पत्नींसाठी आजचा दिवस चांगला आहे. दिवसभर कठोर मेहनत घ्यावी लागेल. भावनाशीलता आणि उदारपणा तुमच्या कमजोरी ठरू शकतात. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे.
अंक ७ (ज्या कोणत्याही महिन्यात ७, १६ आणि २५ तारखेला जन्म झालेले)
गणेश म्हणतात, जमीन आणि वाहन संबंधित कामांसाठी शुभ संधी निर्माण होईल. व्यवसायात प्रगती होईल. दिवसभर मेहनत करावी लागेल. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. असावधतेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अंक ८ (ज्या कोणत्याही महिन्यात ८, १७ आणि २६ तारखेला जन्म झालेले)
गणेश म्हणतात, दिवसभर मेहनतीने काम करावे लागेल. राजकीय कामांमध्ये सावध राहा. मनोरंजनात वेळ जाईल. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळेल. अभ्यासात प्रगती होईल.
अंक ९ (ज्या कोणत्याही महिन्यात ९, १८ आणि २७ तारखेला जन्म झालेले)
गणेश म्हणतात, आपल्या उद्दिष्टाकडे लक्ष द्या. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस योग्य आहे. घरातील वडिलधाऱ्यांच्या आरोग्याबद्दल चिंता वाढू शकते. अध्यात्मिक कामात प्रगती होईल. सर्व कामांमध्ये यश मिळेल.

