New Gadgets : 2026 या नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोणते प्रमुख स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत? Apple, Samsung, Motorola, Oppo आणि Vivo या ब्रँड्सचे नवे हँडसेट उपलब्ध होत असून लवकरच लाँच होणारे मोबाईल खालीलप्रमाणे आहेत.
(New Gadgets) नवी दिल्ली : प्रत्येकासाठी स्मार्टफोन हा आयुष्याचा महत्त्वाचा घटक बनला आहे. जसजशी टेक्नॉलॉजी विकसित होत आहे, तसतसे या स्मार्टफोनमध्ये लहान किंवा मोठे बदल केले जात आहेत. मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या पिक्सलपासून त्याच्या प्रोसेसरपर्यंत अपग्रेडेशन होतच आहे. हीच स्मार्टफोनची वैशिष्ट्ये ठरत आहेत. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या ब्रॅण्डचे नवे हँडसेट बाजारात येत आहेत. त्यात अगदी ॲपलपासून व्हिवो कंपनीच्या हँडसेटचा समावेश आहे.
म्हणूनच स्मार्टफोनप्रेमींसाठी 2026 हे वर्ष खूप उत्सुकतेचे असणार आहे. यातील काही मोबाईल नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बाजारात येतील. Apple चा iPhone 17E हा त्यापैकीच एक मॉडेल आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 2026 च्या सुरुवातीला बाजारात येणारे प्रमुख स्मार्टफोन्स कोणते आहेत ते पाहूया.
2026 च्या सुरुवातीला बाजारात येणारे फोन्स
1. आयफोन 17E (iPhone 17E)
Apple चा बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन म्हणून ओळखला जाणारा iPhone 17E, 2026 च्या फेब्रुवारी/मार्च महिन्यात बाजारात दाखल होईल, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. Apple च्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नसला तरी, ही लाँचची वेळ जवळपास निश्चित मानली जात आहे. Elek च्या रिपोर्टनुसार, iPhone 17E मध्ये iPhone 16E प्रमाणेच OLED पॅनल असेल. या फोनमध्ये iPhone 17 लाइनअपमधील A19 प्रोसेसर आणि डायनॅमिक आयलंड (Dynamic Island) मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, iPhone Air 2, iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि iPhone Fold सप्टेंबर 2026 मध्ये, तर iPhone 18 आणि iPhone 18E मार्च 2027 मध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.
2. सॅमसंग गॅलेक्सी एस26 सीरीज (Samsung Galaxy S26 series)
आणखी एक प्रमुख फोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) देखील 2026 च्या सुरुवातीला आपली नवीन सीरीज लाँच करेल. गेल्या काही वर्षांपासून सॅमसंगचे प्रमुख लाँच जानेवारीत होत असले तरी, आता समोर आलेल्या लीक्सनुसार, गॅलेक्सी एस26 सीरीज (Galaxy S26 series) फेब्रुवारी 2026 मध्ये सादर केली जाईल. फेब्रुवारीच्या मध्यात गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट (Galaxy Unpacked event) होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला हे फोन्स ग्राहकांच्या हातात येतील. कॅमेरा-केंद्रित गॅलेक्सी एस26 अल्ट्रा (Galaxy S26 Ultra) या सीरीजमधील मुख्य आकर्षण असेल. 2026 च्या जुलै महिन्यात गॅलेक्सी झेड फोल्ड 8 (Galaxy Z Fold 8) आणि फ्लिप 8 (Flip 8) लाँच होण्याची शक्यता आहे.
3. गूगल पिक्सल 10a (Google Pixel 10a)
गूगलचा मिड-रेंज स्मार्टफोन पिक्सल 10a (Pixel 10a) मार्च 2026 मध्ये जागतिक स्तरावर सादर केला जाईल. 10 ते 20 मार्च दरम्यान गूगल पिक्सल 10a ची लाँच तारीख असेल, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. भारतात मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला पिक्सल 10a दाखल होण्याची अपेक्षा आहे. पिक्सल 9a चा उत्तराधिकारी असलेला हा फोन Tensor G4 चिपसेटसह येईल अशी अपेक्षा आहे.
4. मोटोरोला रेझर 2026 (Motorola Razr 2026)
Motorola Razr 2026, Razr Plus 2026 आणि Razr Ultra 2026 हे तीन स्मार्टफोन मॉडेल्स बाजारात येणार आहेत. यापैकी किमान एक रेझर मॉडेल एप्रिल/मे 2026 मध्ये बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. तर, Motorola Razr Ultra 2026 ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या तीनही रेझर फोन्समधील फरक चिपसेटची शक्ती, कव्हर स्क्रीनचा आकार, किंमत आणि कॅमेरा यामध्ये असेल.
5. विवो एक्स300 अल्ट्रा (Vivo X300 Ultra)
Vivo X300 Ultra हा विवोचा टॉप-व्हेरियंट फोन मॉडेल असेल, जो ड्युअल 200-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह सादर केला जाईल अशी अपेक्षा आहे. हा फोन मार्च 2026 मध्ये लाँच होऊ शकतो. 200MP मुख्य कॅमेरा, 200MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स व्यतिरिक्त, यात स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 (Snapdragon 8 Elite Gen 5) चिप आणि फास्ट चार्जिंग असेल. लीक्सनुसार, Vivo X300 Ultra जागतिक स्तरावर लाँच करण्याची तयारी सुरू आहे. हा फोन Vivo X200 Ultra ची जागा घेईल.
6. ओप्पो फाइंड एक्स9 अल्ट्रा (Oppo Find X9 Ultra)
Oppo Find X9 Ultra हा फ्लॅगशिप फोन एप्रिल 2026 मध्ये सादर होण्याची शक्यता आहे. Oppo Find X9 Ultra मध्ये 7000mAh ची शक्तिशाली बॅटरी, स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 (Snapdragon 8 Elite Gen 5) चिप आणि 200MP मुख्य कॅमेऱ्यासह ऑप्टिकल अपग्रेड अपेक्षित आहे. Find X9 आणि Find X9 Pro हे 2025 च्या अखेरीस लाँच झाले असले तरी, अल्ट्रा मॉडेलचे लाँच 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते.


