- Home
- lifestyle
- Navratri 2025: नवरात्रीत गरबा खेळायला जाताय? आधी ‘ही’ महत्वाची खबरदारी घ्या, जीवावर बेतू शकतं!
Navratri 2025: नवरात्रीत गरबा खेळायला जाताय? आधी ‘ही’ महत्वाची खबरदारी घ्या, जीवावर बेतू शकतं!
Navratri 2025: नवरात्रीत गरबा खेळताना हृदयविकाराच्या घटना वाढल्याने आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. गरबा खेळण्यापूर्वी आरोग्य तपासणी, डिहायड्रेशन टाळणे, उपवास आणि मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यायची खबरदारी यावर महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

नवरात्रीत गरबा खेळताय?, जाणून घ्या सुरक्षिततेचे सोपे उपाय
Navratri 2025: नवरात्र उत्सवाची रंगत यंदा 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नऊ रात्रींमध्ये देवीची पूजा, उत्साह, रंग-बिरंगी पोशाख आणि मुख्य म्हणजे गरबा-डांडियाचा जल्लोष! पण या उत्सवात सहभागी होताना फक्त उत्साह नव्हे, तर आरोग्याचीही सजगता आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांपासून असे अनेक प्रकार समोर आले आहेत, जिथे गरबा खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे गरबा खेळायला जात असाल, तर पुढील आरोग्यविषयक टिप्स लक्षात ठेवाव्यात.
गरबा खेळण्यापूर्वी आरोग्याची तपासणी अनिवार्य!
गरबा ही एक प्रकारची तीव्र शारीरिक क्रिया आहे, म्हणजेच व्यायामच आहे.
त्यामुळे आधी हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नवरात्रीपूर्वी सराव करा, अचानक आणि अधिक वेळ गरबा खेळल्याने थकवा आणि अडचणी निर्माण होऊ शकतात.
गरबा आणि डिहायड्रेशन, घातक कॉम्बो!
गरबा खेळताना घाम खूप येतो, त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होऊ शकतं.
खेळताना दर 20-30 मिनिटांनी पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्सचे पेय घ्या.
फळांचा रस, लिंबूपाणी यासारखे द्रवपदार्थ पचायला हलके आणि पोषणदायक असतात.
उपवास + गरबा = धोका?
उपवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
रिकाम्या पोटी गरबा खेळणे टाळा, त्यामुळे चक्कर, थकवा किंवा बेशुद्ध पडण्याची शक्यता असते.
थोडं तरी खाऊन मग गरबा खेळा, सुकामेवा, फळं, ताक, दूध यांसारख्या गोष्टी उपयुक्त ठरतात.
मधुमेहाच्या रुग्णांनी घ्या विशेष काळजी
रक्तातील साखरेचा स्तर चढ-उतार होत असल्याने अचानक अटॅकचा धोका असतो.
गरब्यापूर्वी आणि नंतर ब्लड शुगर चेक करा.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी खाली बसून थोडा वेळ विश्रांती घेणं आवश्यक आहे.
ब्रेक घ्या, जीव वाचवा
तासंतास गरबा खेळण्याऐवजी दर काही वेळांनी ब्रेक घ्या.
थोडं बसून, पाणी पिऊन, पुन्हा जोशात सामील व्हा.
आरोग्य बिघडल्यास लगेच जवळच्या प्राथमिक उपचार कक्षात जा.
शारीरिक क्षमतेनुसार खेळा गरबा
नवरात्र म्हणजे केवळ नृत्य नव्हे, तर शक्ती आणि आरोग्याचाही उत्सव आहे. गरबा खेळताना फक्त रंगत नव्हे, तर सावधगिरीही आवश्यक आहे. योग्य तयारी, आरोग्याची तपासणी आणि शारीरिक क्षमतेनुसार गरबा खेळल्यासच नवरात्रीचे खरे समाधान मिळेल.
Disclaimer
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

