Marathi

Jyeshtha Gauri Avahana : गौरीचे गणपतीसोबत नाते काय? वाचा 5 खास गोष्टी

Marathi

गौरी आवाहन

आज (10 सप्टेंबर) गौरी आवाहन असून याच्या दुसऱ्या दिवशी गौरीची पूजा केली जाणार आहे. गणेशोत्सावेळी गौरीपूजनाचे महत्व आणि गौरीचे गणपतीसोबतचे नाते काय हे जाणून घेऊया.

Image credits: Facebook
Marathi

पार्वतीचे दुसरे नाव

वास्तविकरित्या गणपतीला गौरीनंदन म्हटले जाते. नंदन म्हणजे पूत्र असे म्हटले जाते. याचाच अर्थ असा होतो की, गणपती गौरीचा पुत्र आहे.तर पार्वतीचे दुसरे नाव गौरी आहे.

Image credits: facebook
Marathi

गौरीचे गणपतीसोबतचे नाते

हिंदू देवशास्रात आणि समाज जीवनामध्ये गौरी शिवाच्या शक्तीचे आणि गणपतीच्या आईचे रुप मानण्यात आले आहे. अग्निपुराणामध्ये गौरींचे सामूहिक पूजन केले जायचे आणि याला फार महत्व आहे.

Image credits: facebook
Marathi

गणपतीसह गौरीची पूजा

गणेशोत्सवावेळी दहा दिवस केवळ गणपतीची नव्हे तर तीन दिवस त्याच्या दोन मातांचीही पूजा केली जाते. गणपतीला द्वैमातुर असे म्हटले जाते.

Image credits: facebook
Marathi

गणपतीच्या माता

गणपतीची पहिली आई म्हणजे पार्वती आणि दुसरी आई म्हणजे गंगा. महालक्ष्मीच्या सणावेळेस जेष्ठा गौरी म्हणजे गंगा आणि कनिष्ठा गौरी म्हणजे पार्वती म्हणून त्यांचे आवाहन करत पूजा केली जाते.

Image credits: Facebook
Marathi

अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी व्रत

भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरीवेळी तिचे पूजन करत स्रिया अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी हे तीन दिवस व्रत करतात.

Image credits: Facebook
Marathi

ओवसाचे महत्व

गौरीपुजनामध्ये 'ओवसा' ही एक परंपरा दिसून येते. 'ओवसा' म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे. काही लोक ओवशाल्या 'ववसा' असंही म्हणतात. नववधूंसाठी पहिला ओवसा फार महत्वाचा असतो. 

Image credits: Facebook
Marathi

आदिशक्तीचे रुपही मानले जाते

गौरीला आदिशक्तीचे रुपही मानले जाते. अशा शक्ती स्वरूप गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते.

Image credits: Facebook
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Instagram