श्रीगणेशाला दुर्वा इतक्या का आवडतात आणि त्यांना दुर्वा का अर्पण केल्या जातात? खरंतर त्यामागे एक पौराणिक कथा आहे. जाणून घेऊयात
अनलासुर नावाच्या राक्षसाला श्री गणेशाने गिळल्याने श्री गणेशाच्या पोटात तीव्र जळजळ होऊ लागली. त्याच्या पोटातील जळजळ कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. पण दिलासा मिळाला नाही.
त्यानंतर ऋषी कश्यप यांनी दुर्वाच्या 21 गुंठ्या बनवून श्री गणेशाला खाऊ घातल्या आणि दुर्वा प्राशन करताच त्यांच्या पोटातील जळजळ कमी झाली.
तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा प्रिय आहे. गणेशोत्सवादरम्यान दुर्वा अर्पण करूनही तुम्ही गणपतीचा आशीर्वाद घेऊ शकता.
22 दुर्वा एकत्र करून 11 जोड्या तयार केल्या जातात. या दुर्वा श्रीगणेशाच्या चरणी अर्पण करा.
ओम गं गणपतये नमः, ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम विघ्ननाशनाय नमः, ओम विनायकाय नमः,
ओम ईशपुत्रय नमः, ओम सर्वसिद्धिप्रदाय नमः, ओम सर्वसिद्धिप्रदाय नमः ओम इभवक्ताय नमः, ओम मुष्कवाहनाय नमः, ओम कुमारगुर्वे नमः।
वाचकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. यात जी माहिती दिलीय ती धार्मिक ग्रंथांवर आधारित आहे. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा करत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.