- Home
- lifestyle
- गरमागरम वडापाव, वाफाळता चहा, सिझलिंग नुडल्स यासह या 7 डिशेस तुम्ही पावसाळ्यात चुकवूच शकत नाही
गरमागरम वडापाव, वाफाळता चहा, सिझलिंग नुडल्स यासह या 7 डिशेस तुम्ही पावसाळ्यात चुकवूच शकत नाही
मुंबईत पावसाची रिमझिम सुरू झाली की, गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. कुरकुरीत स्नॅक्सपासून ते गरमागरम पेयांपर्यंत, पावसाळ्यात मनाला आणि पोटाला समाधान देणारे पदार्थ खाण्याची एक उत्तम संधी मिळते.

मुंबईतील पावसाळी पदार्थ
मुंबईवर वरुणराजाची कृपा सुरु झाली की, गरमागरम पदार्थांची ओढ लागते. मसालेदार स्ट्रीट फूडपासून ते घरातील पारंपारिक पदार्थांपर्यंत, हे पावसाळी पदार्थ प्रत्येक दिवसाला चव, उब आणि आनंद देतात, ज्यामुळे पावसाळा खरोखरच अविस्मरणीय बनतो.
गरमागरम पकोडे
गरमागरम पकोडे
कांदा, बटाटा किंवा पनीरचे सोनेरी, कुरकुरीत पकोडे पावसाळ्यात आवर्जून खावेत. घराबाहेर पावसाची रिपरिप आणि या पकोड्यांचा कुरकुरीतपण अगदी जुळून येतो. त्यामुळे उपदार मनाला उभारी मिळते.
मसाला चहा
मसाला चहा
आले, वेलची आणि लवंग घातलेला गरमागरम मसाला चहा प्रत्येक दिवस खास बनवतो. त्याचा मसालेदार सुगंध हवेत दरवळतो, तर प्रत्येक घोट हृदयाला उब देतो, ज्यामुळे तो पकोडे, गप्पा आणि पावसाच्या संगीतासाठी उत्तम साथसंगत करतो.
वडा पाव
वडा पाव
मुंबईचा आयकॉनिक वडापाव पावसाळ्यात वेगळाच लागतो. पावमध्ये ठेवलेला मसालेदार बटाट्याचा वडा, चटणी लावून, तळलेल्या मिरचीसोबत दिला जातो. पावसात उभे राहत तो खाण्याची मजा काही न्यारीच असते.
मक्याचे कणीस
कणीस (भाजलेला कॉर्न)
लिंबू, मीठ आणि मसाला लावलेले आणि अगदी ताजे भाजलेले मक्याचे कणीस हा सर्वात सोपा आणि आठवणीत राहणारा पावसाळी स्नॅक आहे. रस्त्यावरील विक्रेत्याकडून गरम गरम विकत घेतलेले आणि समुद्र किनारी किंवा बाल्कनीत खाल्लेले कणीस दिवस सार्थकी लावते.
मॅगी नूडल्स
मॅगी नूडल्स
पटकन बनणारे, गरम आणि आठवणीत राहणारे मॅगी नूडल्स पावसाळ्यात आवर्जून खाल्ले जाते. वाफाळणारे हे नुडल्स म्हणजे मोठे सुख असे म्हणता येईल. त्याचा मसाला आणि ग्रेव्हीही तेवढीच सुखद असते.
पाव भाजी
पाव भाजी
लोणी, मसालेदार भाजी आणि भाजलेल्या पावची जोडी पावसाळ्यात मन संतुष्ट करते. तिखटपणा, मसाले आणि चवींचे मिश्रण थंड, पावसाळी संध्याकाळी अतिशय समाधानकारक वाटते, ज्यामुळे ही मुंबईची आवडती डिश झाली आहे.
गरमागरम जिलबी
गरम जिलबी
पावसाळी दिवसांना गोड शेवट हवा असतो. त्यामुळे कुरकुरीत, पाकात बुडवलेल्या जिलबीपेक्षा काहीही चांगले नाही. गरम दुधाच्या किंवा चहाच्या कपासोबत त्या उत्तम लागतात. त्यांची उबदार गोडी निराशेला दूर करते, बाहेर पाऊस पडत असताना तुम्हाला निखळ गोडवा प्रदान करते.

