वैवाहिक आयुष्यात कायम टिकेल गोडवा, पण या 5 गोष्टी ठेवा लक्षात

| Published : Jan 02 2025, 08:57 AM IST

married couples

सार

वैवाहिक नाते आनंदी आणि मजबूत टिकवून ठेवणे हे पती-पत्नीच्या हातात असते. नात्यात कितीही वाद-भांडणे झाली तरीही एकमेकांना समजून घेत काही गोष्टी केल्या पाहिजेत. तरच नाते दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. 

Relationship Advice : वैवाहिक आयुष्यात अनेक चढउतार येतात. पण कपलने एकमेकांना समजून घेत काही गोष्टी एकत्रितपणे केल्यास नक्कीच नाते दीर्घकाळ टिकले जाते. पती-पत्नीमध्ये एकमेकांबद्दलच्या काही गोष्टींसंदर्भात स्पष्टता ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. खरंतर, नात्यात गोडवा तेव्हाच टिकतो जेव्हा पती-पत्नी एकमेकांना त्यांच्या सर्व गोष्टींसह आपलेसे करतात. जाणून घेऊया वैवाहिक आयुष्यात गोडवा कायम टिकून राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर...

लहान-लहान गोष्टी मनावर घेऊ नका

लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांसोबत 24 तास असतात. यावेळी एकमेकांमध्ये काही कारणास्तव कधीतरी वाद होणे सामान्य बाब आहे. पण वाद झाल्यानंतर एक पार्टनर त्यामुळे दुखावला गेल्यास त्यचा नात्यावर परिणाम होऊ शकतो. दोघांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नात्यात वाद झाल्यास एकत्रितपणे बसून त्यावर बोला.

पार्टनरची सहमती नसल्यास...

कधीकधी असे होते की, पार्टनर तुमच्या मताशी सहमत नसतो. यावेळी पार्टनरने एखाद्या गोष्टीसाठी का नकार दिला असेल याचा देखील विचार करा. प्रत्येकवेळी तुम्ही सांगितलेली गोष्ट पार्टनर मान्य करेल असे नाही. दुसऱ्या पार्टनरलाही त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी द्या.

एकमेकांच्या यशाला बळ देणे

वैवाहिक आयुष्यात पार्टनरला आपलेसे करुन त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये उभे रहावे असे सांगितले जाते. पार्टनरचे करियर, हेल्थ किंवा अन्य काही कामांमध्ये पार्टनरला पुढे जाण्यास प्रोत्साहन करावे. याशिवाय दोघांनी एकमेकांना आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रेरित करावे.

जबाबदाऱ्या वाटून घ्या 

वैवाहिक आयुष्यात सुखी आणि आनंदी रहायचे असल्यास एकमेकांनी जबाबदाऱ्या वाटून घ्यावात. जेणेकरुन एकावरच सर्व गोष्टींचा बोझा पडणार नाही. याशिवाय जबाबदाऱ्या स्विकारल्यानंतर त्या पूर्ण पार पाडताना काही अडथळे येत असल्यास दुसऱ्या पार्टनरने त्या सांभाळून घ्यावात. नाते तेव्हाच टिकते जेव्हा दोघांकडून ते टिकवण्याचा प्रयत्न केला जातो हे लक्षात ठेवा. 

एकमेकांच्या सुख-दु:खात उभे रहा 

पती-पत्नीने आपल्या वैवाहिक आयुष्यात गोडवा कायम टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणे देखील फार महत्वाचे आहे. पार्टनरचे तुमच्या आयुष्यातील महत्व समजून घ्यावे. पार्टनर एखाद्या वाईट स्थितीतून जात असल्यास त्याला धीर देण्याचा प्रयत्न करावा. 

आणखी वाचा : 

2025 या नववर्षात नातं मजबूत करायचंय?, जाणून घ्या 7 महत्त्वाच्या टिप्स!

Chanakya Niti: या विशेष चिन्हांनी महिलांचे खरे स्वरूप समजून घ्या