Makar Sankranti 2025 : तिळगूळ घ्या गोड गोड बोला...मकर संक्रांतीसाठी खास संदेश

| Published : Jan 14 2025, 09:22 AM IST / Updated: Jan 14 2025, 10:45 AM IST

Makar Sankranti 2025
Makar Sankranti 2025 : तिळगूळ घ्या गोड गोड बोला...मकर संक्रांतीसाठी खास संदेश
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Makar Sankranti 2025 : आज देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी तिळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणत एकमेकांना तिळाचा लाडू दिला जातो. अशातच मकर संक्रांतीनिमित्त खास मराठमोळे संदेश मित्रपरिवाराला पाठवून आजचा सण साजरा करा. 

Makar Sankranti 2025 Wishes in Marathi : आज  (14 जानेवारी) देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा मार्गक्रमण याला संक्रांत असे म्हणतात. सूर्य मकर राशीतून मार्गक्रमण करतो म्हणून मकर संक्रांत असे म्हटले जाते. शिवाय मकर संक्रांतीला तिळाचे लाडू एकमेकांना देत तिळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणत सण साजरा केला जातो. आजच्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मित्रपरिवाराला खास मराठमोळे संदेश, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाठवून नात्यामधील गोडवा अधिक वाढवा. 

मकर संक्रांत 2025 निमित्त खास मेसेज 

  • तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो.
    मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात
    आशेची किरणे घेऊन येवो
    हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • गोड नाती गोड सण
    तुम्हाला मिळो खूप धन
    आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी
    राहो तुमच्या अंगणी
    तिळगुळ घ्या गोड गोड बोला

  • मराठी अस्मिता, मराठी मन,
    मराठी परंपरेची मराठी शान,
    आज संक्रांतीचा सण,
    घेऊन आला नवचैतन्याची खाण!
    तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
  • विसरुनी जा दुःख तुझे हे,
    मनालाही दे तू विसावा..
    आयुष्याचा पतंग तुझा हा,
    प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
    मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

आणखी वाचा : 

मकरसंक्रांतीला ओवसा का नेला जातो, काय आहे आख्यायिका?

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला लहान मुलांचे बोरन्हाण का करतात?

Read more Articles on