श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्यांचं महत्त्व सर्वांनाच माहिती आहे, पण महाराष्ट्रीयन स्टाईलच्या हिरव्या बांगड्यांचं वेगळंच आकर्षण असतं. नवीन नवरींपासून ते सर्वच महिलांसाठी, हे डिझाईन्स खूपच सुंदर दिसतात!

मुंबई - महिलांचा खास श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावणात केवळ भगवान शिवाची पूजाच होत नाही, तर या महिन्यात श्रावण सोमवारी, मंगळागौरी आणि हरियाली तीजसह रक्षाबंधनचा सणही असतो. याशिवाय महिला या संपूर्ण महिन्यात हिरव्या रंगाच्या साडी, सूट आणि लेहेंगा परिधान करतात. तसेच महिला हातात हिरव्या बांगड्याही घालतात. श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्याचे विशेष महत्त्व आहे. अशावेळी भारतीय आणि हिंदू महिला हिरव्या बांगड्या घालणे पसंत करतात. जर तुम्हीही श्रावणात हिरव्या बांगड्या घालत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी मॉडर्न फॅन्सीपेक्षा वेगळ्या पारंपारिक मराठी स्टाईल हिरव्या बांगड्यांच्या काही सेटचे डिझाईन आणले आहेत, जे तुम्हालाही खूप आवडतील. चला तर मग महाराष्ट्रीयन स्टाईलच्या हिरव्या बांगड्यांचे सेट पाहूया.

महाराष्ट्रीयन हिरव्या बांगड्यांचे सेट (Maharashtrian Green Bangle Set)

नवीन नवरीसाठी हिरव्या बांगड्यांचा सेट

नवीन नवरीसाठी हिरव्या बांगड्यांचा हा सेट खूपच शानदार आणि सुंदर आहे. बांगड्यांचा हा सेट हिरव्या रंग आणि सोनेरी धातूच्या कंकणाबरोबर मॅच करून तयार केला आहे. बांगड्यांच्या या सेटमध्ये तुम्ही मध्ये मध्ये पातळ सोनेरी कंकण किंवा स्टोन असलेल्या सोनेरी बांगड्या घालू शकता, जे खूपच सुंदर दिसेल.

६ सोनेरी कंकणांसह हिरव्या बांगड्यांचा सेट

६ सोनेरी कंकणांसह बांगड्यांचा हा सेट या वर्षीच्या नवीन नवरीसाठी किंवा ज्यांचा पहिला श्रावण आहे त्यांच्यासाठी खास आहे. श्रावण हा साजशृंगाराचा महिना आहे आणि अशावेळी भरलेल्या कलाई सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकतात. हिरव्या बांगड्यांच्या मध्ये ६ वेगवेगळ्या आकाराचे कंकण सेट केले आहेत.

स्टोन असलेल्या सोनेरी कंकणाबरोबर हिरव्या बांगड्या

सोनेरी कंकण बहुतेकदा मीनाकारी किंवा साधे असतात, अशावेळी जर तुम्हाला थोडा वेगळा लूक हवा असेल तर सोनेरी कंकणात स्टोनचा वापर करू शकता. स्टोनच्या कामासह हिरव्या बांगड्या खूपच उठून दिसतील.

जड सोनेरी कंकणाबरोबर हिरव्या बांगड्या

जड आणि रुंद सोनेरी कंकणाबरोबर अशा प्रकारे हिरव्या बांगड्या सेट करून तुम्ही तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवू शकता. रुंद कलाईवर अशा प्रकारचे कंकण आणि हिरव्या बांगड्या सावनाची बहार हातात आणतील.

(मराठी पद्धतीच्या या हिरव्या बांगड्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर पुण्यातील तुळशीबाग येथे हमखास सापडतील. तसेच मुंबईत दादरच्या मार्केटमध्ये या बांगड्या परवडणार्या दरात मिळतील. या शिवाय कोणत्याही शहरातील महिलांच्या मार्केटमध्ये सहज दिसतील. या बांगड्या घेताना फक्त भाव करायचे विसरु नका.)