ज्योतिषानुसार, सूर्य आणि चंद्र एकमेकांपासून सातव्या घरात असताना समसप्तक योग तयार होतो. हा योग सिंह, धनु आणि कुंभ या तीन राशींसाठी विशेष फायदेशीर ठरणार असून, त्यांना करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळतील.
समसप्तक योगाचे फायदे
ज्योतिषज्ञानुसार ग्रह आणि त्यांच्या जागेचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. याच संदर्भात समसप्तक योग हा तयार होत असतो. हा योग सूर्य आणि चंद्र एकमेकांपासून सातव्या घरात असताना होत असतो. या काळात सूर्य मिथुन राशीत आणि चंद्र धनु राशीत भ्रमण करत असतो. हा योग काही राशींसाठी नवीन संधी आणि करिअरमध्ये प्रगती घेऊन येईल. विशेषतः तीन राशींना याचा सर्वाधिक फायदा होईल.

सिंह
सिंह राशींच्या व्यक्तींची आता विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले प्रकरण आता गती पकडायला लागतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आता आनंदाची बातमी मिळेल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागायला सुरुवात होईल.
धनु
या राशीवर यावेळी सर्वाधिक प्रभाव पडणार आहे. त्यामुळं अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यातील प्रभाव वाढेल. तुम्हाला मनशांती आणि आत्मविश्वास मिळायला मदत होईल. कामाच्या ठिकाणी आपल्या गुणांची प्रशंसा केली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात फायदा होईल. वैवाहिक जीवन सुखी होईल.
कुंभ
हा योग्य कुंभ राशीच्या लोकांमध्ये आनंद आणि ऊर्जा घेऊन येणार आहे. तुम्हाला बऱ्याच काळापासून पेंडिंग असलेली काम करण्याची संधी मिळणार आहे. भविष्यात कामासंबंधित प्रवासातून सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. करिअरमधील प्रगतीतील अडथळे दूर होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना त्यांच्या इच्छेनुसार संधी मिळू शकते. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकते.

