सार

Lalbaugcha Raja 2024 Live Telecast : लालबागच्या राजाची गेल्या दहा दिवस मनोभावे पूजा-प्रार्थना केल्यानंतर आज (17 सप्टेंबर) निरोप दिला जाणार आहे. तत्पूर्वी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक येथे थेट लाइव्ह पाहता येईल.

Lalbaugcha Raja 2024 Visarjan Miravanuk Live : मुंबईतील प्रसिद्ध गणपतींपैकी एक असणाऱ्या लालबागच्या राजाला आज अनंत चतुर्थीच्या दिवशी निरोप दिला जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दहा दिवसात बाप्पाची मोठ्या मनोभावे पूजा-प्रार्थना करण्यात आली. भाविकांनीही राजाच्या दर्शनाला प्रत्येक वर्षीप्रमाणे  यंदाही गर्दी केल्याचे दिसून आले. लालबागच्या राजाच्या भव्य मिरवणूकीलाही थोड्यावेळाने गर्दी होताना दिसून येणार आहे. आजच्या दहाव्या दिवशी बाप्पाची उत्तरपूजा ते विसर्जनापर्यंतचे थेट लाइव्ह येथे पाहता येणार आहे.