सार

16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेनंतर सूर्य तुळ राशीत प्रवेश करणार आहे. अशातच कोणत्या राशींना लाभ होणार याबद्दल जाणून घेऊया...

Sharad Purnima 2024 Rashifal : अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा येत्या 16 ऑक्टोबरला साजरी केली जामार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरला सूर्य कन्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे चार राशींचे नशीब चमकणार आहे. याशिवाय देवी लक्ष्मीचे आशीर्वादही मिळणार आहेत. याबद्दल जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना धनलाभ
मेष राशीमधील व्यक्तींचे अडकलेले पैसे पुन्हा परत मिळणार आहे. याशिवाय आधी केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होणार आहे.कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नवे काम सुरु करण्यासाठी योग्य दिवसही आहे. परिवारात आनंदाचे वातावरण राहिल. देवी लक्ष्मीची कृपा होईल आणि घरात सुख-समृद्धी येईल,

सिंह राशी
सिंह राशीच्या व्यक्तींना मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. व्यवसायात मोठी डील होऊ शकते. यामुळे भविष्यात फायदा होईल. परिवार आणि समाजात लोकप्रियता वाढली जाईल. कोणताही प्रवास सुखकर होईल.

तुळ राशीच्या व्यक्तींना मिळणार नोकरी
तुळ राशीच्या व्यक्तींना मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने अडकलेली कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते. एखाद्याचे तुमच्यावर कर्ज असल्यास ते फिटले जाईल. पार्टनरशिपच्या व्यवसायात लाभ होईल. गुंतवणूकीसाठी उत्तम वेळ आहे.

कुंभ राशी
कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सुधारले जाईल. एखादे नवे वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. सासरच्या मंडळींकडून गोड बातमी कळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असून त्यांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे. अविवाहितांसाठी देखील उत्तम काळ आहे.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

D अक्षरावरुन मुलींसाठी 20 हिंदू नावांसह अर्थ घ्या जाणून

महिलांनी पतीसमोर कोणत्या 4 गोष्टी करू नयेत?