सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या रोपाची पाने खाल्ल्यास कित्येक आजार दूर होण्यास मदत मिळू शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
तुळशीची पाने खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. गंभीर आजारांपासूनही आरोग्याचे संरक्षण होते.
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने व्यवस्थित चावून खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होतील. अॅसिडिटी आणि पोट-ओटीपोटामध्ये होणारी जळजळ देखील कमी होऊ शकते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी तुळशीची पाने अतिशय लाभदायक ठरू शकतात. कारण यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
तुळशीच्या पानांना येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या सुगंधामुळे तसेच औषधी गुणधर्मामुळे तोंडाला येणाऱ्या दुर्गंधी व तोंडाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.
तुळशीच्या पानातील औषधी गुणधर्मामुळे यकृताचे कार्य सुधारण्यास व सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत मिळते.
सर्दी-खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वीपासूनच तुळशीच्या पानांचा काढा करून पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे सर्दी-खोकला कमी होण्यास मदत मिळते.
मानसिक तणावापासून सुटका हवी असल्यास रोज तुळशी पाने खाण्यास सुरुवात करा. यामुळे मूड फ्रेश राहील व ताणतणावही कमी होईल.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.