MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Kitchen Tips : हिवाळ्यात भांडी घासण्यासाठी गरम पाण्याची गरज नाही, वापरा ही पद्धत

Kitchen Tips : हिवाळ्यात भांडी घासण्यासाठी गरम पाण्याची गरज नाही, वापरा ही पद्धत

Kitchen Tips : हिवाळ्यात पाणी एवढे लगेच थंड होते की, त्यात हात घालण्याची हिम्मत होत नाही. अशा वेळी भांडी धुण्याचा कंटाळाच येतो. पण गरम पाणी नसले तरी काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही आरामात भांडी धुवू शकता. जाणून घ्या माहिती -

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jan 06 2026, 05:31 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
हात सुन्न होतात
Image Credit : Freepik

हात सुन्न होतात

हिवाळ्यात थंडी वाढल्यामुळे आपली रोजची कामंही अधिक कठीण होतात. सकाळी लवकर उठण्यापासून ते भांडी घासण्यासाठी पाण्यात हात घालण्यापर्यंत सर्व काही त्रासदायक वाटतं. थंड पाण्यामुळे तुमचे हात सुन्न होऊ शकतात. यामुळे तुमची बोटंही आखडतात आणि काही मिनिटांतच जळजळ होऊ शकते.

26
सोपा आणि सोयीस्कर मार्ग
Image Credit : Freepik

सोपा आणि सोयीस्कर मार्ग

रोज घरकाम करणाऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न आणखी जटील होतो. खरंतर, प्रत्येक घरात गिझर बसवणे इतके सोपे नसते. त्यामुळे कोणताही मोठा खर्च न करता भांडी धुण्याचे सोपे आणि सोयीस्कर मार्ग जाणून घेणे खूप उपयुक्त ठरू शकते.

Related Articles

Related image1
Diwali Cleaning : पितळेची भांडी चमकतील सोन्यासारखी, या टिप्स वापरुन मिनिटांत करा स्वच्छ
Related image2
तांब्याची भांडी मिनिटांत होतील स्वच्छ, घरी अशी तयार करा पितांबरी पावडर
36
रबर किंवा सिलिकॉनचे हातमोजे
Image Credit : flipkart

रबर किंवा सिलिकॉनचे हातमोजे

हिवाळ्यात भांडी धुण्यासाठी नळ चालू करताच थंड पाणी हाताला विजेच्या धक्क्यासारखं लागतं. भांडी धुणे खूप अवघड काम होऊन बसतं. त्यामुळे भांडी धुण्याचे हातमोजे घालणे हा हिवाळ्यात भांडी धुण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. होय. रबर किंवा सिलिकॉनचे हातमोजे तुमच्या हातांचे थंड पाण्याच्या थेट संपर्कापासून संरक्षण करतात. यामुळे हात सुन्न होणे आणि त्वचा कोरडी पडणे किंवा जळजळ होणे टाळता येते.

46
डिटर्जंटपासून संरक्षण
Image Credit : Getty

डिटर्जंटपासून संरक्षण

हातमोजे घातल्याने तुम्ही जास्त वेळ आरामात भांडी धुूऊ शकता. इतकेच नाही, तर ते तुमच्या हातांचे डिटर्जंट आणि जंतूंपासून संरक्षण करतात. आजकाल जाड, आतून अस्तर असलेले हातमोजेही उपलब्ध आहेत, जे हिवाळ्यासाठी अधिक फायदेशीर आहेत. 

56
बजेटनुसार खरेदी करा
Image Credit : Getty

बजेटनुसार खरेदी करा

स्थानिक किराणा दुकान, सुपरमार्केट किंवा हार्डवेअरच्या दुकानातही भांडी धुण्याचे हातमोजे सहज उपलब्ध असतात. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विविध आकार आणि गुणवत्तेचे हातमोजे उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार निवड करू शकता.

66
भांडी धुणे होईल अधिक सोपे
Image Credit : Getty

भांडी धुणे होईल अधिक सोपे

काही हातमोज्यांमध्ये आतून कापसाचा थर असतो, जो थंडीपासून अतिरिक्त संरक्षण देतो. योग्य आकाराचे हातमोजे निवडल्याने चांगली पकड मिळते आणि ते हातातून घसरतही नाहीत. एकदा खरेदी केल्यावर ते अनेक दिवस आरामात वापरता येतात. यामुळे हिवाळ्यात भांडी धुणे अधिक सोपे होते.

About the Author

MD
Marathi Desk 1
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
लोहरी 2026 गिफ्ट आयडिया: सुनेला गिफ्ट करा ही नाजूक गोल्ड+AD फिंगर रिंग
Recommended image2
14KT गोल्ड स्लीक सुई-धागा, 10 हजारात बनवा नाजूक डिझाइन्स
Recommended image3
कमी बजेटमध्ये रॉयल लूक! बेस्टीला सरप्राईज देण्यासाठी हे चांदीचे कानातले आहेत बेस्ट
Recommended image4
Relationships : चाळीशीत घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे का? काय आहे 'मेनोडिव्होर्स'?
Recommended image5
हिवाळ्यात गर्भवती महिलांनी काय खावे? या पदार्थांनी बाळाला मिळेल ताकद
Related Stories
Recommended image1
Diwali Cleaning : पितळेची भांडी चमकतील सोन्यासारखी, या टिप्स वापरुन मिनिटांत करा स्वच्छ
Recommended image2
तांब्याची भांडी मिनिटांत होतील स्वच्छ, घरी अशी तयार करा पितांबरी पावडर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved