MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Kitchen Hacks : बाजारातून आणलेली केळी दीर्घकाळ कशी ठेवावीत फ्रेश? जाणून घ्या सोप्या टिप्स

Kitchen Hacks : बाजारातून आणलेली केळी दीर्घकाळ कशी ठेवावीत फ्रेश? जाणून घ्या सोप्या टिप्स

How to Store Bananas : केळी जास्तीत जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या साध्या-सोप्या टिप्स

3 Min read
Harshada Shirsekar
Published : Oct 24 2023, 05:51 PM IST| Updated : Oct 26 2023, 10:47 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
केळी कशी टिकवून ठेवावीत?
Image Credit : Getty

केळी कशी टिकवून ठेवावीत?

घरात काही नसेल आणि लवकरात लवकर भूक शमवायची असेल, तर यावर सर्वात हेल्दी पर्याय म्हणजे केळी खाणे. केळे हे फळ खाण्यासाठी ते स्वच्छ धुण्याची किंवा कापण्याचीही गरज नसते. महत्त्वाचे म्हणजे या फळामध्ये आरोग्यास आवश्यक असणाऱ्या कित्येक पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. म्हणूनच आहारतज्ज्ञ देखील केळ्याचे पॅनकेक्स, केळ्याचे शेक किंवा केळ्याचे सॅलेड खाण्याचा सल्ला देतात.

29
केळ्यांसाठी आवश्यक असलेले तापमान
Image Credit : Getty

केळ्यांसाठी आवश्यक असलेले तापमान

पण केळे हे फळ जास्तीत जास्त काळ टिकून राहत नाही. यामुळे बाजारातून केळी विकत आणल्यानंतर दोन दिवसांतच ती खाणे गरजेचं असते. अन्यथा केळी जास्त पिकून काळी पडतात आणि मग हे फळ खाण्यायोग्य राहत नाही. केळी जास्तीत जास्त काळ टिकू राहण्यासाठी सरासरी तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असणं आवश्यक असते. त्यामुळे हिवाळा वगळता उन्हाळ्यात हे फळ टिकणं कठीणच. पण काही सोप्या घरगुती टिप्स जर आपण आजमावून पाहिल्या तर केळी दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत मिळू शकते. केळी जास्त काळ फ्रेश कशी ठेवायची? याबाबत आपण साध्या सोप्या घरगुती पद्धती जाणून घेऊया…

(रोज 1 एक कप प्या हे पाणी, निरोगी आरोग्यासाठी आहे अमृतासमान)

39
केळी लवकर का पिकतात ?
Image Credit : Getty

केळी लवकर का पिकतात ?

  • सर्व फळांमध्ये इथिलीन नावाचा वायू असतो. जो फळांच्या पिकण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत असतो.
  • अन्य फळांच्या तुलनेत केळ्यामध्ये इथिलीन वायूचे प्रमाण जास्त असते. 
  • केळीच्या देठांमधून इथिलीन वायू मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो, ज्यामुळे केळी पिकण्याची प्रक्रिया जलदगतीने होते.
  • इथिलीन वायूमुळे होणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे फळ मऊ होते.
  • इथिलीन वायूमुळे फळे नैसर्गिकरित्या पिकण्याची प्रक्रिया सुरू झाली की त्यावर नियंत्रण मिळवणं अशक्य आहे.
  • विशेष म्हणजे आपण केळीसोबत अन्य कोणतेही फळे ठेवले तर ते सुद्धा लवकर पिकते.
49
Kitchen Tip 1 : केळी जास्त काळ टिकवण्यासाठी जाणून घेऊया साध्या सोप्या पद्धती
Image Credit : Getty

Kitchen Tip 1 : केळी जास्त काळ टिकवण्यासाठी जाणून घेऊया साध्या सोप्या पद्धती

स्टेप 1 : बाजारातून विकत आणलेल्या केळीचा घड घ्या

स्टेप 2 : केळीचा घड एका हुकमध्ये अडकवा

केळी जलदगतीने पिकण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी केळीचा घड हुकमध्ये अडकवून झाडावर असल्याप्रमाणे एखाद्या उंच ठिकाणी लटकवून ठेवा.

59
केळीचा घड एका हँगरवर लटकवून ठेवा
Image Credit : Getty

केळीचा घड एका हँगरवर लटकवून ठेवा

हुक वापरून केळीचा घड हँगरवर लटकवून ठेवा. हँगरवर ठेवताना केळ्यांना कोणत्याही गोष्टीस स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. अगदी भिंतीचाही केळ्यांना स्पर्श होता कामा नये. केळीच्या घडाचा कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागास स्पर्श होण्यापासून रोखल्यास अ‍ॅसिडचे विघटन कमी होऊन फळ पिकण्याची प्रक्रिया मंद होण्यास मदत मिळले.

(पीरियड्समुळे होणाऱ्या वेदनांपासून हवीय सुटका? करा हे नैसर्गिक उपाय)

69
थंडावा असलेल्या ठिकाणी केळ्याचा घड लटकवा
Image Credit : Getty

थंडावा असलेल्या ठिकाणी केळ्याचा घड लटकवा

केळी टिकून राहण्यासाठी सरासरी तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असणे गरजेचं आहे. यामुळे केळ्यांवर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्या तसंच किचनमधील उष्णतेपासूनही दूर थंडावा असलेल्या ठिकाणी केळ्यांचा घड लटकवावा. यामुळे केळी जास्त काळ टिकण्यास मदत मिळू शकते.

79
Kitchen Tip 2: इथिलीन वायूशी येणारा संपर्क कमी करावा
Image Credit : Getty

Kitchen Tip 2: इथिलीन वायूशी येणारा संपर्क कमी करावा

  • केळी पिकवणारा इथिलीन वायू प्रामुख्याने फळाच्या देठातून उत्सर्जित होतो. त्यामुळे यावरच तोडगा शोधणे गरजेचं आहे.
  • केळीच्या देठावर प्लास्टिक फॉइल गुंडाळून ठेवल्यास केळे फ्रेश राहू शकते. जाणून घेऊया पद्धत...
  • घडातून एक-एक करून केळी देठासह वेगळी करा. देठ तुटणार नाही, याची काळजी घ्यावा.
  • प्लास्टिक फॉइल घ्या व ते केळीच्या देठावर गुंडाळा. हीच प्रक्रिया घडातील प्रत्येक केळ्यावर करावी.
89
Hack 3: फॉइल गुंडाळलेली केळी फ्रीजमध्ये ठेवा
Image Credit : Getty

Hack 3: फॉइल गुंडाळलेली केळी फ्रीजमध्ये ठेवा

केळ्यांचे देठ फॉइलने गुंडाळल्यानंतर सर्व केळी फ्रीजमध्ये ठेवू शकता. तुमच्या रूमच्या तापमानाच्या तुलनेत फ्रीजमध्ये ठेवलेली केळी जास्त काळ टिकतील. यामुळे फळाच्या चवीवर कोणताही परिणाम होणार नाही.

(हातावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे 10 व्यायाम)

99
जास्त पिकलेल्या केळ्यांचा वापर कसा करावा?
Image Credit : Getty

जास्त पिकलेल्या केळ्यांचा वापर कसा करावा?

विकत आणलेले सामान वापराविना फेकून दिल्यास नुकसान झाल्याची भावना मनात येते. कारण पै-पै वाचवून आपण सर्व गोष्टी जमा करत असतो. त्यामुळे पिकलेली केळी देखील कचऱ्यात फेकणे कठीणच असते. पण काळवंडलेली केळी फेकण्याऐवजी आपण त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता.

  • ब्युटी ट्रीटमेंट - जास्त प्रमाणात पिकलेल्या केळ्यांचा आपण त्वचा आणि केसांसाठी वापर शकता. यापासून आपण फेस पॅक किंवा हेअर पॅकही तयार करू शकता.
  • रोपांसाठी खत - केळ्यांपासून आपण घरातील तसंच घराबाहेरील रोपांसाठी, झाडांसाठी खत तयार करू शकता.

About the Author

HS
Harshada Shirsekar

Recommended Stories
Recommended image1
Festival Calendar 2026 : पुढील वर्षात होळी, दसरा, दिवाळी कधी? नोट करा तारीख
Recommended image2
प्रत्येक महिलेकडे असावी ही 6 Hair Accessories, लग्नसोहळ्यात वापराल
Recommended image3
Daily Horoscope 13 December 2025 : कोणाला होणार लाभ तर या राशीच्या व्यक्तींनी आज रहा सावध, वाचा आजचे राशीभविष्य
Recommended image4
हिवाळ्यात फॅशन करताना कमी उंचीच्या मुली करतात या चुका, माहिती घ्या जाणून
Recommended image5
Health Tips : सकाळी उठल्यानंतर डोकं दुखतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved