घरच्या घरी ग्रील सॅन्डविच कसं बनवावं, खाऊन मुलं चाटत राहतील बोट
ही रेसिपी वापरून तुम्ही ग्रिल मशीनशिवाय तव्यावर परफेक्ट स्ट्रीट-स्टाईल ग्रिल सॅन्डविच बनवू शकता. ब्रेड, भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून, एका खास युक्तीने सॅन्डविचला बाहेरून खुसखुशीत आणि आतून ज्यूसी बनवता येते.

घरच्या घरी ग्रील सॅन्डविच कसं बनवावं, खाऊन मुलं चाटत राहतील बोट
आपण घरच्या घरी ग्रील सॅन्डविच बनवू शकतो. अगदी सहज सोप्या पद्धतीने हे सॅन्डविच बनवता येत. आपण खाली दिलेल्या पद्धतीनुसार सॅन्डविच बनवल्यास मुले बोट चाटत राहतील.
साहित्य
ब्रेड स्लाइस – 2, बटर, हिरवी चटणी, टोमॅटो स्लाइस, काकडी स्लाइस, कांदा स्लाइस, सॅन्डविच मसाला / मिरपूड, चीज
ब्रेड तयार करा
दोन्ही ब्रेड स्लाइसवर भरपूर बटर लावा. एकीकडे हिरवी चटणी लावा. चटणीच्या वर भाज्यांचे स्लाइस एकसारखे मांडून ठेवा.
सॅन्डविच फिलिंग सेट करा
टोमॅटो, काकडी, कांदा यानंतर सॅन्डविच मसाला शिंपडा. हवे असल्यास किसलेले चीज घाला. दुसरी ब्रेड ठेवून सॅन्डविच बंद करा.
तव्यावर शेकण्याची स्टेप
तवा गरम करा. बटर लावून सॅन्डविच तव्यावर ठेवा. वर एक प्लेट ठेवून त्यावर वजन ठेवा (कुकर/भांडं). यामुळे सुंदर ग्रिल मार्क्स येतात.
उलटून शेकून घ्या
दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर 2-3 मिनिटे शेकून घ्या. ब्रेड गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी झाल्यावर उतरवा
सर्व्ह करा
गरमागरम ग्रिल सॅन्डविच चटणी किंवा केचअपसोबत सर्व्ह करा. बाहेरून खुसखुशीत, आतून ज्यूसी – परफेक्ट स्ट्रीट-स्टाईल!

