डोशाचे पीठ तव्याला चिकटते? मग ही ट्रिक वापरा, कुरकुरीत डोसे होतील
डोसा सर्वांनाच आवडतो. पण तो बनवताना एक अडचण असते, ती म्हणजे, अनेकदा डोशाचे पीठ पॅनला किंवा तव्याला चिकटते. मग अशावेळी काय करायचं? काही सोप्या टिप्स वापरल्या तर ही समस्या सहज दूर होऊ शकते, असे जाणकार सांगतात.

डोसा बनवणे अवघड आहे का?
अनेकदा डोसा बनवताना पीठ तव्यावर टाकल्यावर ते चिकटते. त्यामुळे हा पदार्थ बनवणे खूप अवघड आहे, असे समजून काहीजण तो बनवण्याचे टाळतात. पण आता असं करू नका.
या सोप्या टिप्स वापरून पाहा
पुढच्या वेळी तुम्ही तव्यावर डोसा बनवताना या काही सोप्या टिप्स वापरा. या टिप्समुळे पीठ तव्याला चिकटण्यापासून रोखण्यास मदत होईल.
कच्चा कांदा
कच्चा कांदा पीठ तव्याला चिकटण्यापासून रोखतो. यासाठी कच्चा कांदा अर्धा कापून घ्या. तो तेलात बुडवून गरम तव्यावर घासा. यामुळे तव्यावर नॉन-स्टिक थर तयार होतो. त्यामुळे पीठ तव्याला चिकटत नाही आणि डोसा बनवणे सोपे होते.
पिठाची कन्सिस्टन्सी
डोशाचे पीठ तव्याला चिकटत असेल, तर पिठाच्या कन्सिस्टन्सीकडे लक्ष द्या. पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ असेल, तर ते तव्याला चिकटण्याची शक्यता जास्त असते. पीठ तव्यावर सहज पसरेल असे असावे. त्यामुळे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावे.
ही गोष्ट लक्षात ठेवा
पीठ टाकण्यापूर्वी तवा चांगला गरम करून घ्या. तवा थंड असेल तर पीठ नक्कीच चिकटेल. डोसा तव्याला चिकटू नये असे वाटत असेल, तर डोसा बनवण्यापूर्वी तवा व्यवस्थित गरम करा. तवा गरम झाल्यावर त्याला तेल लावा आणि मग डोसा घाला.

