सार

चांगले दिसण्यासाठी महागडे उत्पादने आवश्यक नाहीत. संतुलित आहार, पुरेशी झोप, व्यायाम, त्वचेची योग्य काळजी आणि ताण नियंत्रण या सोप्या सवयींसह निसर्गतः आकर्षक दिसणे शक्य आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चांगलं दिसणं ही फक्त बाह्य गोष्ट नसून आत्मविश्वास वाढवणारी आणि व्यक्तिमत्त्व खुलवणारी एक महत्त्वाची गोष्ट ठरली आहे. चांगलं दिसण्यासाठी फक्त महागड्या उत्पादनांवर अवलंबून राहण्याची गरज नाही; काही सोप्या सवयी आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारल्याने तुम्ही निसर्गत: आकर्षक दिसू शकता.

चांगलं दिसण्यासाठी अंगीकारा या सवयी: 

संतुलित आहार:

शरीराला आवश्यक पोषण देणारा आहार घ्या. फळे, भाज्या, डाळी, सुकामेवा आणि प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्वचा आणि केस तजेलदार होतात. जास्त साखर, तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड टाळा. 

पुरेशी झोप घ्या:

दररोज 7-8 तासांची झोप आवश्यक आहे. झोप पूर्ण असल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येत नाहीत आणि त्वचाही निरोगी राहते. 

पाणी पिण्याच्या सवयी सुधारा:

दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि त्वचेला निखार देते. 

व्यायामाचा सराव:

रोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. योगा, प्राणायाम किंवा चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेचा निखार वाढतो. 

त्वचेसाठी योग्य काळजी:

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य फेसवॉशचा वापर करा. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा नियमित वापर करा. आठवड्यातून एकदा स्क्रब आणि फेसमास्क लावा. 

ताणतणावावर नियंत्रण ठेवा:

ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम यांचा अवलंब करा. ताणमुक्त राहिल्यास त्वचा चमकदार आणि तरुण दिसते. 

योग्य कपडे निवडा:

तुमच्या शरीरयष्टीला साजेसे आणि आरामदायी कपडे घाला. रंगसंगती आणि कपड्यांचा पोत तुमच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवतो. 

चांगलं दिसण्यासाठी टाळा या गोष्टी: 

रात्री उशिरा झोपणे आणि पुरेशी झोप न घेणे. तळकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे. जास्त प्रमाणात मेकअपचा वापर; त्वचेवर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात.