आज ६ ऑगस्ट २०२६ रोजी गण्ड आणि लुंब हे दोन अशुभ योग, तर वृद्धी आणि पद्म हे दोन शुभ योग तयार होत आहेत. दिवसभर या योगांचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल.

Daily Horoscope 6 August 2026 : गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी दिवसभर राहील. या तिथीचे स्वामी भगवान रुद्र आहेत, त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणं शुभ मानलं जातं. आज गण्ड, वृद्धी, पद्म आणि लुंब नावाचे ४ शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. ग्रहांच्या स्थितीत आज कोणताही मोठा बदल होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस…

मेष राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Mesh Rashi)

आज ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि बॉसही तुमच्या कामगिरीवर खूश राहतील. पैशांची आवक स्थिर राहील. विद्यार्थ्यांचं अभ्यासात पूर्ण लक्ष लागेल. जुन्या मित्रांना भेटल्यामुळे मन प्रसन्न होईल. घराच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचा विचार करू शकता.

वृषभ राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Vrishabh Rashi)

आज तुमच्या डोक्यात नव्या कल्पना येतील आणि त्यातून तुमची अनेक कामं पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबाशी संबंधित प्रकरणं सामंजस्याने सोडवा. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. संध्याकाळचा वेळ कुटुंब किंवा मित्रांसोबत मजेत जाईल.

मिथुन राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Mithun Rashi)

आज तुमची सगळी कामं प्लॅन करून करा, तरच चांगले परिणाम मिळतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यात प्रेम वाढेल. कमी मेहनतीतही चांगले यश मिळू शकते. विनाकारण होणाऱ्या वादांपासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Kark Rashi)

एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना मनात गोंधळ निर्माण होईल. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवा आणि बोलण्यापूर्वी विचार करा, कारण तुमच्या बोलण्याने कोणीतरी नाराज होऊ शकतं. प्रेमसंबंधांमध्ये भावनिकता वाढेल. घर किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

सिंह राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Singh Rashi)

आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, ज्याचा फायदा तुम्हाला पुढे कामात होईल. आर्थिक बाबतीत थोडं सांभाळून राहा. गरजेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या घेऊ नका, नाहीतर कामाचा ताण वाढू शकतो. तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास यश नक्की मिळेल.

कन्या राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Kanya Rashi)

आज कुटुंबातील मोठ्या माणसांसोबत एखाद्या शुभ कार्यक्रमाचं नियोजन होऊ शकतं. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. भावनिक बाबतीत घाई करू नका. कामाच्या ठिकाणी कर्मचारी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतरचा वेळ थोडा आव्हानात्मक असू शकतो.

तूळ राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Tula Rashi)

जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर मित्रांची पूर्ण साथ मिळेल. जोडीदारासोबत मिळून घरातील जबाबदाऱ्या पार पाडाल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात हलगर्जीपणा करू नये. लोखंडी अवजारं किंवा मशीन वापरताना काळजी घ्या.

वृश्चिक राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Vrishchik Rashi)

बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांवर आज तोडगा निघेल. तुमच्या मनातल्या गोष्टी जोडीदाराला सांगा, यामुळे नातं आणखी घट्ट होईल. प्रेमसंबंधांमध्ये कटुता येऊ शकते. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. हृदयरोगाशी संबंधित लोकांनी तणावापासून दूर राहावं. मोठ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनु राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Dhanu Rashi)

परदेशात राहणाऱ्या लोकांना घरी परतण्याची संधी मिळू शकते. कला, संगीत किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगला आहे. संध्याकाळच्या वेळी कोणत्याही वादात पडू नका. पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा.

मकर राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Makar Rashi)

दिवसाची सुरुवात थोड्या निगेटिव्ह विचारांनी होऊ शकते, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने येईल. व्यावसायिक आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष देतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबाची साथ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल.

कुंभ राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Kumbh Rashi)

वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत असलेले अडथळे दूर होऊ शकतात. एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याचा प्लॅन होऊ शकतो. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळेल. भावनांच्या आहारी न जाता व्यावहारिक विचार करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.

मीन राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६ (Meen Rashi)

आज कोणताही मोठा किंवा महत्त्वाचा निर्णय घेणं टाळा. मुलांशी प्रेमाने आणि संयमाने वागा. घशात इन्फेक्शन किंवा खवखव होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी फिरायला गेल्याने मन हलकं होईल. भागीदारीच्या व्यवसायात काही आव्हानं येऊ शकतात.


(Disclaimer : या लेखात दिलेली माहिती धार्मिक ग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांच्याकडून घेतलेली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीचा वापर केवळ सूचनेसाठी करावा.)