- Home
- lifestyle
- Honda Bike Scooter Price Drop : दिवाळीपूर्वीच होंडाच्या बाईक आणि स्कूटरवर तब्बल 18,887 रुपयांपर्यंतची सूट, GST Cut चा मोठा फायदा!
Honda Bike Scooter Price Drop : दिवाळीपूर्वीच होंडाच्या बाईक आणि स्कूटरवर तब्बल 18,887 रुपयांपर्यंतची सूट, GST Cut चा मोठा फायदा!
Honda Bike Scooter Price Drop नवीन जीएसटीमुळे होंडा बाईक आणि स्कूटरच्या किमती सुमारे ₹१८,८८७ पर्यंत कमी झाल्या आहेत. अॅक्टिव्हा, शाईन, युनिकॉर्न, CB350 सारख्या लोकप्रिय मॉडेल्समध्ये चांगली बचत होऊ शकते. जाणून घ्या डिटेल्स…

अॅक्टिव्हाची नवी किंमत
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी होंडा बाईक आणि स्कूटरच्या किमती कमी केल्या आहेत. नवीन जीएसटीचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय होंडाने घेतला आहे. यामुळे अनेक लोकप्रिय बाईक आणि स्कूटर ₹१८,८८७ पर्यंत स्वस्त झाले आहेत.
होंडाच्या किमतीत कपात
नवीन जीएसटीनुसार, ३५०cc पेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकींवरील २८% कर १८% पर्यंत कमी झाला आहे. याचा फायदा होंडाच्या अॅक्टिव्हा, शाईन १२५, युनिकॉर्न, CB350 सारख्या लोकप्रिय मॉडेल्ना मिळाला आहे. मात्र, ३५०cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईकवरील कर ३१% वरून ४०% पर्यंत वाढल्याने, त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
होंडा युनिकॉर्नची किंमत
मॉडेलनुसार, अॅक्टिव्हा ११० वर ₹७,८७४ ची सूट, अॅक्टिव्हा १२५ वर ₹८,२५९ ची सूट, SP125 वर ₹८,४४७ ची सूट, आणि युनिकॉर्नवर ₹९,९४८ ची सूट मिळत आहे. CB350 H’ness वर ₹१८,५९८, CB350RS वर ₹१८,८५७, आणि CB350 वर ₹१८,८८७ पर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे.
होंडा स्कूटरवर सूट
लोकप्रिय स्कूटर डिओ ११० आणि १२५ वर अनुक्रमे ₹७,१५७ आणि ₹८,०४२ पर्यंत सूट मिळत आहे. SP160, हॉर्नेट 2.0, NX200 सारख्या मॉडेल्नाही ₹१०,००० ते ₹१४,००० पर्यंत सूट मिळाली आहे.
दुचाकींवरील जीएसटी कपात
यामुळे होंडा ग्राहकांना कमी किमतीत बाईक आणि स्कूटर खरेदी करण्याची संधी देत आहे. सणासुदीच्या काळात ही सूट होंडाच्या विक्रीला चालना देईल अशी अपेक्षा आहे.

