पावसाळ्यात सतत शिंका येतात? करा हे सोपे घरगुती उपाय

| Published : Jun 24 2024, 12:13 PM IST

Sneezing Home Remedies

सार

Sneezing Home Remedies :  सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच आरोग्यासंबंधित विविध समस्या उद्भवतात. यापैकीच एक म्हणजे सतत शिंका येणे. तुम्हीही सततच्या शिंका येण्याच्या समस्येने त्रस्त आहात तर पुढील काही घरगुती उपाय करू शकता.

Sneezing Home Remedies : बहुतांशजणांना सर्दी-खोकला झाल्यानंतर काहींना शिंका येतात. खरंतर, शिंका येणे सामान्य बाब आहे. पण सततच्या शिंका येणे एखाद्या समस्येचे संकेत असू शकतात. शिंका येण्यामागील कारणे म्हणजे धूळ-माती, मसालेदार पदार्थ, सर्दी-खोकला आणि अ‍ॅलर्जी असू शकतात. सध्या पावसाळ्याचेही दिवस सुरु असून तुम्हाला हलक्या पावसामुळेही शिंका येतातय का? यावर पुढील काही घरगुती उपाय करू शकता.

व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थ खा
वारंवार शिंका येण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचे सेवन करा. यासाठी संत्र, लिंबू अशा फळांचा डाएटमध्ये समावेश करावा.

वाफ घ्या
गरम पाण्याची वाफ घेतल्याने बंद झालेल्या नाकाला आराम मिळतो. याशिवाय नाकातील शेंबूडही बाहेर निघतो. यासाठी एका भांड्यात पाणी उकळवून घ्या आणि त्यात बाम अथवा युकेलिप्टस तेल टाका. यानंतर डोक्यावरुन टॉवेल घेत वाफ घ्या.

हळद आणि दूधाचे सेवन
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे सर्दी आणि शिंका येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. एक ग्लास गरम दूधात अर्धा चमचा हळद मिक्स करुन प्या. या घरगुती उपायामुळे शिंका येण्याची समस्या कमी होईल. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होईल.

मध आणि आल्याचे मिश्रण
आलं हे आरोग्यासाठी फायदेशीर असून यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. शिंका येण्याच्या समस्येने त्रस्त असल्यास आल्याचा रस काढून त्यामध्ये अर्धा चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास घश्यात होणारी खवखव, शिंका येण्याची समस्या दूर होईल.

तुळस आणि काळी मिरी चहा
तुळस आणि काळी मिरीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. यामुळे सर्दी आणि खोकल्याच्या समस्येपासून दूर राहता येते. तुळशीची पाने आणि काळी मिरी पावडर एक कप पाण्यात उकळवून प्या. यामध्ये मधही मिक्स करू शकताय यामुळे तुम्हाला सतत येणाऱ्या शिंका कमी होण्यास मदत होईल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

पावसाळ्यात Frizzy Hair ची काळजी घेण्यासाठी टिप्स, वाढेल केसांची चमक

पावसाळ्यात महिलांनी बॅगेत ठेवा 5 गोष्टी, कोणत्याही स्थितीत येतील कामी