World Vegan Day : जागतिक वीगन दिनानिमित्त, वीगन डाएटमधूनही भरपूर प्रोटीन कसे मिळवता येते ते जाणून घ्या. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी वीगन ऑम्लेट, टोफू टिक्का मसाला यांसारख्या ३ हाय-प्रोटीन वीगन रेसिपी ट्राय करा.

World Vegan Day: जागतिक वीगन दिन दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे लोकांमध्ये वीगन डाएटबद्दल जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे. वीगन डाएटमध्ये पुरेसे प्रोटीन नसते, अशी शंका अनेकदा लोकांच्या मनात असते, पण हे खरं नाही. नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्या प्रोटीनयुक्त रेसिपींचा आहारात समावेश करता येईल, ते जाणून घेऊया.

नाश्त्यामध्ये ट्राय करा वीगन ऑम्लेट

वीगन डाएटमध्ये फक्त वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. यामध्ये प्राण्यांपासून मिळणारे दूध किंवा मांसाचा वापर अजिबात केला जात नाही. जर तुम्ही नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त डाएट घेत असाल, तर व्हेज ऑम्लेट बनवू शकता. यासाठी तुम्हाला एक कप मूग डाळ रात्रभर भिजवावी लागेल. नंतर हे मिश्रण वाटून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये तुम्ही चवीनुसार मीठ, लाल तिखट घालू शकता. गरम तव्यावर थोडे ऑलिव्ह ऑईल किंवा बटर लावून मिश्रण पसरवा. आता त्यावर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची इत्यादी घाला. नंतर ५ मिनिटे झाकून शिजू द्या आणि दुसऱ्या बाजूनेही परतून शिजवून घ्या. हे शेंगदाण्याच्या चटणी किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खा.

दुपारच्या जेवणात बनवा वीगन डाळ मखनी

डाळ मखनी बनवण्यासाठी क्रीमचा वापर केला जातो, पण जेव्हा वीगन डाळ बनवली जाते, तेव्हा त्यात क्रीमऐवजी काजू क्रीम वापरली जाते. सर्वात आधी उडीद डाळ आणि राजमा ६ तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये ५ ते ६ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. आता एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल घालून त्यात जिरे, कांदा, आले-लसूण पेस्ट, टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात तुमच्या आवडीचे मसाले घालून तेल सुटेपर्यंत शिजवा. शिजवलेल्या डाळीत दुधाच्या क्रीमऐवजी काजू क्रीमचा वापर करा. त्यानंतर कोथिंबीरीने सजवा. तयार आहे प्रोटीनयुक्त वीगन डाळ मखनी.

रात्रीच्या जेवणात टोफू टिक्का मसाला समाविष्ट करा

टोफूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. टोफू टिक्का मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी टोफूमधून दाबून पाणी काढून टाका. आता टिक्का मसाला बनवण्यासाठी प्लांट-बेस्ड दही, लिंबाचा रस, लसूण आणि आले एकत्र करून टोफूला ४ ते ५ तास मॅरीनेट करा. टोफूचे तुकडे १०-१२ मिनिटे भाजून घ्या किंवा ग्रिल करा. हे गरमागरम नानसोबत खाता येते.