MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Sleep Disorders : 8 तास झोपूनही सकाळी थकवा जाणवतोय? या 5 धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Sleep Disorders : 8 तास झोपूनही सकाळी थकवा जाणवतोय? या 5 धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

रात्री ७ ते ९ तास शांत झोपूनही सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवतोय का? तज्ज्ञांच्या मते, हे अजिबात सामान्य नाही. यामागे काही गंभीर कारणं असू शकतात.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 17 2026, 01:51 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
८ तास झोपूनही सकाळी थकवा का जाणवतो?
Image Credit : pinterest

८ तास झोपूनही सकाळी थकवा का जाणवतो?

रात्री ७ ते ९ तास झोपूनही सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटत नाही का? फक्त अंथरुणावर पडून राहणं म्हणजे चांगली झोप नव्हे. शरीराला खऱ्या अर्थाने गाढ झोपेची गरज असते. जयपूरच्या सीके बिर्ला हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसिन तज्ज्ञ डॉ. शिवानी स्वामी सांगतात की, रात्रभर झोपूनही थकवा का जाणवतो आणि कोणत्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू नये, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. झोप म्हणजे फक्त वेळेचं गणित नाही, तर त्या वेळात शरीर आणि मेंदूला किती आराम मिळतो हे महत्त्वाचं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
अपूर्ण झोपेचा शरीरावर होणारा परिणाम
Image Credit : pinterest

अपूर्ण झोपेचा शरीरावर होणारा परिणाम

तुम्ही ७ ते ९ तास झोपता, पण तरीही शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. रात्री तुमची झोप वारंवार मोडत असेल, तर शरीर नैसर्गिक झोपेचं चक्र पूर्ण करू शकत नाही. रात्री झोप मोडल्याचं तुमच्या लक्षातही येत नाही. पण दिवसा खूप थकवा येणं, सतत झोप येणं, कामात लक्ष न लागणं किंवा सकाळी डोकं दुखणं यांसारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे सकाळच्या थकव्याला फक्त कामाचा ताण समजण्याची चूक करू नका. श्वासोच्छवासाचा त्रास किंवा इतर काही आजार तर नाहीत ना, हे तपासून पाहा.

Related Articles

Related image1
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Related image2
Sunscreen Tips : SPF 30 की 50? सनस्क्रीन घेण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की जाणून घ्या
35
स्लीप ॲपनिया आणि त्याची लक्षणं
Image Credit : pinterest

स्लीप ॲपनिया आणि त्याची लक्षणं

झोपेत असताना श्वासनलिका अंशतः किंवा पूर्णपणे बंद होते, तेव्हा 'ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया' (Obstructive Sleep Apnoea) हा आजार होतो. मोठ्याने घोरणं, झोपेत काही सेकंद श्वास थांबणं, श्वास कोंडून अचानक जाग येणं आणि दिवसा सतत थकवा जाणवणं ही याची मुख्य लक्षणं आहेत. लठ्ठ लोकांमध्ये हे प्रमाण जास्त असलं, तरी योग्य वजन असलेल्यांनाही हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सतत घोरण्याची सवय असेल किंवा सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नसेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

45
झोपेची गुणवत्ता बिघडवणारी इतर कारणं
Image Credit : Gemini

झोपेची गुणवत्ता बिघडवणारी इतर कारणं

फक्त श्वासोच्छवासाचे आजारच नाही, तर आपल्या जीवनशैलीतील काही सवयी आणि मानसिक ताणतणावही झोपेचं खोबरं करतात. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित नसणं, रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणं, संध्याकाळी चहा-कॉफी पिणं आणि मद्यपान करणं यामुळे झोपेचं चक्र बिघडतं. याशिवाय मानसिक ताण, चिंता, सर्दी, दम्यासारखे फुफ्फुसांचे आजार किंवा झोपेत पाय हलवण्याची सवय म्हणजेच 'रेस्टलेस लेग सिंड्रोम' (Restless legs syndrome) यामुळेही शांत झोप लागत नाही.

55
सततचा थकवा इतर आजारांचं लक्षण आहे का?
Image Credit : Asianet News

सततचा थकवा इतर आजारांचं लक्षण आहे का?

झोपेच्या समस्यांशिवाय इतर काही वैद्यकीय कारणंही या थकव्यामागे असू शकतात. ॲनिमिया (Anaemia), थायरॉईड, पोषक तत्वांची कमतरता आणि चयापचयाच्या समस्यांमुळे शरीर सतत थकलेलं राहतं. यासाठी योग्य वैद्यकीय तपासणी, रक्तचाचणी किंवा गरज पडल्यास 'स्लीप स्टडी' (Sleep study) करून यामागचं नेमकं कारण शोधता येतं.

झोपेची गुणवत्ता कशी सुधारायची?

झोप सुधारण्यासाठी रोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. यामुळे शरीराचं नैसर्गिक चक्र सुधारतं. संध्याकाळी कॅफीनचं सेवन कमी करा, झोपण्यापूर्वी मोबाईल पाहणं टाळा आणि बेडरूम शांत ठेवा. तरीही सकाळी थकवा जाणवत असेल, मोठ्याने घोरण्याची सवय असेल किंवा श्वास कोंडत असेल, तर याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणं सर्वात सुरक्षित आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Isha Ambani Navratri Look : 10 कारागीर, 90 दिवस आणि 2 हजार तास; ईशा अंबानीच्या लेहेंग्याची खास गोष्ट
Recommended image2
Ear Cuff Designs : कानांना शोभून दिसणाऱ्या इयर कफ डिझाईन्स, देतील रॉयल लूक
Recommended image3
FSSAI Notice : राईस ब्रान ऑइलने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होतं का? बिगबास्केट, फ्लिपकार्टला नोटीस
Recommended image4
Luxury Destinations In India : स्वित्झर्लंडपासून मालदीवपर्यंत...परदेशासारखा फील देणारी भारतातील 5 भारी ठिकाणं
Recommended image5
Pimples Home Remedy : सलग 7 दिवस उपाशीपोटी प्या 'हे' ड्रिंक, हट्टी पिंपल्स होतील गायब
Related Stories
Recommended image1
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Recommended image2
Sunscreen Tips : SPF 30 की 50? सनस्क्रीन घेण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की जाणून घ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved