Marathi

कोरफडीचा ज्युस पिण्याचे फायदे

महिनाभर Aloe Vera ज्युस प्यायल्यास शरीरात कोणकोणते होऊ शकतात बदल?

Marathi

शरीर आतील बाजूने होईल मजबूत

कोरफडीच्या रोपामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ईसह अन्य पोषणतत्त्वांचाही साठा असतो. ज्यामुळे शरीर आतील बाजूने मजबूत होते.

Image credits: Getty
Marathi

पचनप्रक्रियेचं कार्य सुधारते

कोरफडीच्या ज्युसमुळे शरीराच्या पचनप्रक्रियेचं कार्य सुधारण्यास मदत मिळू शकते. बद्धकोष्ठता, गॅस, पोट दुखणे यासारख्या पोटाच्या समस्या कमी होऊ शकतात.

Image credits: Getty
Marathi

त्वचेवर येईल ग्लो

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोरफडीचा ज्युस प्यायल्यास त्वचेला मोठे लाभ मिळू शकतात.

Image credits: Getty
Marathi

केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक

कोरफडीचा ज्युस प्यायल्यास अथवा केसांवर लावल्यास केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. केस मुळासकट मजबूत होतात व केसांवर चमकही येते.

Image credits: Our own
Marathi

शरीर राहते हायड्रेटेड

कोरफडीच्या ज्युसमुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते.

Image credits: Getty
Marathi

काय होऊ शकतात दुष्परिणाम?

आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात कोरफडीचा रस प्यायल्यास शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे जुलाब होणे किंवा पोट दुखणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credits: Getty
Marathi

गर्भवतींनी घ्यावी विशेष काळजी

गर्भवती तसंच स्तनदा मातांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच कोरफडीचा रस पिणे आवश्यक आहे. कारण अशा परिस्थितीत कोणत्याही समस्या उद्भवण्यापूर्वी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Freepik