Marathi

वजन कमी करण्यासाठी उपाय

शरीराचे वाढलेले वजन घटवण्यासाठी व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे. यासाठी कठीण स्वरुपातील व्यायामच करावेत, असा नियम नाही. सोपे व्यायामही आपण करू शकता. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Marathi

शरीर सक्रीय ठेवणे आवश्यक

शरीरातील अतिरिक्त चरबी घटवायची असेल तर शरीर सक्रीय असणे आवश्यक आहे. यासाठी वर्कआउट रूटीनमध्ये खंड पडता कामा नये. यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.

Image credits: Getty
Marathi

सायकल चालवा

सायकल चालवल्यास खूप कमी वेळामध्ये शरीरातील जास्तीत जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत मिळू शकेल. आपण नियमित सायकल चालवल्यास एका तासाला 1 हजार 150 इतक्या प्रमाणात कॅलरी बर्न करू शकता.

Image credits: Getty
Marathi

दोरीच्या उड्या

दोरीवरील उड्यांचा खेळ आपण लहानपणी नक्कीच खेळला असेल. सलग 45 मिनिटे दोरीवरील उड्यांचा व्यायाम केल्यास शरीरातील 450 कॅलरी बर्न होऊ शकतात. तसेच खांदे-पायांचे स्नायू देखील मजबूत होतात.

Image credits: Getty
Marathi

चालणे

चालणे हा सर्वात साधा, सोपा आणि फायदेशीर व्यायाम आहे. नियमित एक तास चालल्यास संपूर्ण शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते आणि मूड देखील फ्रेश राहण्यास मदत मिळते.

Image credits: Getty
Marathi

जॉगिंग

जॉगिंग हा एक हाय कार्डिओ अ‍ॅक्टिव्हिटी व्यायाम प्रकार आहे. जॉगिंग केल्यास शरीरातील जास्तीत जास्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच हा व्यायाम करावा.

Image credits: Getty
Marathi

पायऱ्या चढणे

शरीरातील कॅलरी बर्न करण्याचा सर्वात रामबाण उपाय म्हणजे पायऱ्या चढणे. योग्य पद्धतीने एक तास पायऱ्या चढण्याचा व्यायाम केल्यास 500 ते 600 कॅलरी बर्न होऊ शकतात.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

Navratri 2023 : उपवास करताना काय करावे-काय करू नये? जाणून घ्या गोष्टी

Skin Care : नितळ व चमकदार त्वचेसाठी वापरा हे आयुर्वेदिक फेस पॅक

थांबा! शिजवलेल्या तांदळाचे पाणी फेकताय? असा 8 प्रकारे करा वापर

कामात लक्ष केंद्रित होत नाही? चिडचिड होते? ऑफिस डेक्सवर ठेवा 8 रोपे