MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Leaf Growing Plants: फक्त एका पानातून उगवतात ही ५ झाडं, बाटलीभर पाण्यात ठेवा अन् १५ दिवसांत जादू बघा!

Leaf Growing Plants: फक्त एका पानातून उगवतात ही ५ झाडं, बाटलीभर पाण्यात ठेवा अन् १५ दिवसांत जादू बघा!

Leaf Growing Plants: स्नेक प्लांट, जेड, बेगोनिया, अफ्रीकन वायलेट आणि पाथरचट्टा... ही ५ इनडोअर झाडं फक्त एका पानातून उगवा. मातीशिवाय, फक्त पाण्यात १०-१५ दिवसांत मुळं तयार होतील आणि तुमचं घर बनेल एक मिनी गार्डन!

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 25 2026, 10:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
फक्त एका पानातून उगवतात ही ५ झाडं, बाटलीभर पाण्यात ठेवा अन् १५ दिवसांत जादू बघा!
Image Credit : chat GPT

फक्त एका पानातून उगवतात ही ५ झाडं, बाटलीभर पाण्यात ठेवा अन् १५ दिवसांत जादू बघा!

घराच्या सजावटीसाठी आता महागडी झाडं विकत घ्यायची गरज नाही. काही इनडोअर प्लांट्स तर असे आहेत, जे फक्त एका पानातून (Leaf Cutting) उगवतात. तेही मातीशिवाय, फक्त पाण्यात! ही पद्धत सोपी तर आहेच, पण लहान घरं आणि फ्लॅट्ससाठी एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही बागकाम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही ५ झाडं तुमच्यासाठी बेस्ट आहेत. यांना १०-१५ दिवसांतच मुळं फुटतात आणि तुमचं घर हिरवंगार होतं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
स्नेक प्लांट
Image Credit : chat GPT

स्नेक प्लांट

स्नेक प्लांट एक खूपच कणखर आणि कमी देखभालीचं झाड आहे. याचं एक लांब पान कापून पाण्याने भरलेल्या बाटलीत ठेवा. काही दिवसांतच खालून मुळं फुटायला लागतील. हे झाड हवा शुद्ध करायलाही मदत करतं.

Related Articles

Related image1
Gardening Tips: उन्हाळ्यात बाग सुकतेय? पाण्यात ही एक वस्तू मिसळा, आठवड्याभरात झाडं होतील हिरवीगार!
Related image2
Plant Stand: झाडांना द्या उंची, घराला द्या नवा लुक; पाहा 5 स्टायलिश मेटल स्टँड डिझाइन्स
36
जेड प्लांट
Image Credit : chat GPT

जेड प्लांट

जेड प्लांटची जाड पानं पाण्यात सहज मुळं तयार करतात. एक निरोगी पान तोडून बाटलीत ठेवा. साधारण २ आठवड्यांत तुम्हाला नवीन मुळं दिसू लागतील. हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणतं असंही मानलं जातं.

46
बेगोनिया
Image Credit : chat GPT

बेगोनिया

बेगोनियाच्या पानांना पाण्यात खूप लवकर मुळं फुटतात. याचं पान पाण्यात बुडवून ठेवा आणि १०-१२ दिवसांतच तुम्हाला लहान-लहान मुळं दिसू लागतील. घर सुंदर दिसण्यासाठी हे एक परफेक्ट सजावटीचं झाड आहे.

56
अफ्रीकन वायलेट
Image Credit : chat GPT

अफ्रीकन वायलेट

हे झाड लहान पण खूप सुंदर फुलं देतं. याचं एक पान पाण्यात असं ठेवा की फक्त देठ पाण्यात बुडेल. काही दिवसांतच नवीन मुळं आणि पानं फुटायला लागतील.

66
पाथरचट्टा
Image Credit : chat GPT

पाथरचट्टा

पाथरचट्टा, ज्याला आपण 'पानफुटी' असंही म्हणतो, हे असं झाड आहे जे पानातूनच नवीन रोप तयार करतं. याचं पान पाण्यात टाका किंवा फक्त ओलसर ठेवा. काही दिवसांतच त्याच्या कडेने नवीन छोटी रोपं उगवलेली दिसतील. हे झाड औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Rice Storage Hacks : तांदळाला वर्षभर कीड लागू नये म्हणून डब्यात ठेवा 'ही' एक गोष्ट!
Recommended image2
Chanakya Niti : सगळ्यांवर प्रेम करायला तुम्ही देव नाही, कलियुगात जगायचंय तर चाणक्य बना!
Recommended image3
Silk Saree Care : सिल्कची साडी धुताना पाण्यात मिक्स करा ही एक गोष्ट, साडी दिसेल अगदी नवीकोरी!
Recommended image4
Horoscope 10th October 2026 : आज या ३ राशींचे नशीब उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य
Recommended image5
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Related Stories
Recommended image1
Gardening Tips: उन्हाळ्यात बाग सुकतेय? पाण्यात ही एक वस्तू मिसळा, आठवड्याभरात झाडं होतील हिरवीगार!
Recommended image2
Plant Stand: झाडांना द्या उंची, घराला द्या नवा लुक; पाहा 5 स्टायलिश मेटल स्टँड डिझाइन्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved