सार
आज जागतिक वसुंधरा दिन सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त गूगल ने खास डूडल तयार केले असून जगभरातील विशेष ऐरिअल फोटोस त्यांनी शेअर केले आहे.यात प्रत्येक फोटोचा अर्थ तेथील स्थानिक गोष्टीशी संबंध जोडतो. जाणून घ्या काय आहे हे फोटो
दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस एका थीमसह साजरा केला जातो त्यावर वर्ष भर काम करण्यासाठी . यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनची थीम ‘प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक’ अशी आहे. या दिवसानिमित्त गुगलने आपले डूडलही एका खास पद्धतीने तयार केले आहे.Google अक्षरे जगभरातील काही ठिकाणे दर्शवितात जिथे लोक, समुदाय आणि सरकार नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता आणि संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी दररोज काम करत आहे. हे प्राथमिक जरी असले तरी आशावादी आहे परंतु हवामान संकट आणि जैवविविधतेचे नुकसान यावर उपाय करण्यासाठी अजून बरेच काम करायचे आहे याचीही आठवण करून देतात.यासाठी यंदाचे हे खास डूडल गूगल ने तयार केले आहे.
Google अक्षरा प्रमाणे या फोटोंचा अर्थ काय ?
'G' हे अक्षर तुर्क आणि कैकोस बेटांचा फोटो आहे. तर 'O' हे अक्षर मेक्सिकोमधील स्कॉर्पियन रीफ नॅशनल पार्कची प्रतिमा आहे. ज्याला Arrecife de Alacranes असे म्हणतात, हे मेक्सिकोच्या दक्षिणेकडील आखात आणि युनेस्को बायोस्फीअर रिझर्व्हमधील सर्वात मोठे रिफ आहे.हे नॅशनल पार्क लुप्त पक्षी आणि कासव प्रजातींचे आश्रयाचे ठिकाण मानले जाते. तर दुसरा 'O' हा 2008 मध्ये स्थापन झालेल्या आइसलँडच्या Vatnajökull राष्ट्रीय उद्यानाचा फोटो आहे. हे राष्ट्रीय उद्यान युरोपमधील सर्वात मोठ्या हिमनदीचे रक्षण करते आणि म्हणूनच ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.तसेच हे पार्क आसपासच्या परिसंस्थेचे संरक्षण करते. 'G' हे ब्राझीलमधील जाउ नॅशनल पार्क आहे जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे आणि ॲमेझॉन रेनफॉरेस्टमधील एक मोठं जंगल राखीव आहे. याठिकाणी अनेक परिसंस्थेचे संरक्षण केले जाते जस की, जग्वार,जायंट ऑटर आणि ऍमेझॉन मॅनाटी. 'L' हे अक्षर ग्रेट ग्रीन वॉल नायजेरियातील आहे. आफ्रिका युनियनने सुरु केलेला उपक्रम आहे. यामध्ये वाळवंटीकरणामुळे प्रभावित झालेल्या जमिनी व्यवस्थित करणे. यामुळे तेथील उपासमार आणि पाण्याची समस्या नाहीशी होईल. 'E' हे अक्षर ऑस्ट्रेलियातील पिलबारा बेटांचे आहे. हे एक निसर्ग राखीव बेट आहे. ऑस्ट्रेलियातील 20 राखीव बेटांपैकी हे एक बेट आहे.
2024 ची थीम काय आहे ?
जागतिक वसुंधरा दिन 2024 ची थीम आहे, ‘प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक्स’ आहे. ही प्लास्टिक प्रदूषणाची चिंताजनक समस्या आणि पर्यावरणावरील त्याचे भयंकर परिणाम यावर प्रकाश टाकते.