Gold Rate Today : सोन्याच्या दरात सातत्याने घसरण, रेट 90 हजारांखाली येणार?
मुंबई - एक लाख रुपयांच्या पुढे गेलेल्या सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात रोज घट होत आहे. बऱ्याच दिवसांनी सोन्याचा भाव ९७ हजारांवर आला आहे. सोन्याच्या दरात पुढेही घसरण होईल का, जाणून घ्या…

९७ हजारांवर आला सोन्याचा दर
बऱ्याच दिवसांनी सोन्याचा भाव ९७ हजारांवर आला आहे. सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९७,४२० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ८९,३०० रुपये आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी सोन्याचे दर कसे होते ते पाहूया.
प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
* दिल्लीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९७,५७० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,४५० रुपये आहे.
* मुंबईत २४ कॅरेट तोळा सोन्याची किंमत ९७,४२० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,३०० रुपये आहे.
* चेन्नईत २४ कॅरेट तोळा सोन्याची किंमत ९७,४२० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,३०० रुपये आहे.
* बंगळुरूमध्ये २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९७,४२० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,३०० रुपये आहे.
चांदीचे दर कसे आहेत?
सोन्याच्या दरात घट होत असताना चांदीचे दर मात्र वाढत आहेत. देशातील सर्व शहरांमध्ये चांदीचे दर वाढत आहेत. रविवारी दिल्ली, मुंबई, बंगळुरु, कोलकाता या शहरांमध्ये एक किलो चांदीची किंमत १,०७,८०० रुपये होती.
सोन्याचे दर का कमी होत आहेत?
अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी आल्याने गुंतवणूकदार आपली गुंतवणूक तिथे वळवत आहेत. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होऊन त्याचे दर घसरत आहेत. आर्थिक स्थैर्य येत असल्याने अनेक देशांतील गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळत आहेत.
जास्त नफ्याच्या आशेने ते शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होऊन त्याचे दर घसरत आहेत. लवकरच सोन्याचा भाव ९० हजारांवर येण्याची शक्यता आहे.
ग्राहकांसाठी चांगली संधी
दर कमी होत असल्याने सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. दिवाळी, लग्नसमारंभ यासारख्या खास प्रसंगी सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर सध्याचे दर फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
भविष्यात सोन्याचे दर कसे असतील?
सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात, असा अंदाज असला तरी जागतिक आर्थिक परिस्थिती, भू-राजकीय तणाव यासारख्या गोष्टींचा त्यावर परिणाम होईल. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांचाही सोन्याच्या दरावर परिणाम होईल. त्यामुळे सोन्याचे दर घसरतच राहतील का, हे सांगता येत नाही.

