Brain Health Foods: स्मरणशक्ती वाढवायची? हे 7 पदार्थ मेंदूसाठी आहेत वरदान!
Brain Health Foods: स्मरणशक्ती सुधारण्यासाठी चांगल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे महत्त्वाचे आहे. ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.

चांगल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे महत्त्वाचे आहे
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी चांगल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे महत्त्वाचे आहे. ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.
ब्लूबेरी खाल्ल्याने डिमेंशियाचा धोका कमी होण्यास मदत होते
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेली ब्लूबेरी खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि डिमेंशियाचा धोका कमी होण्यास मदत होते.
रोज एक कप पालेभाजी शिजवून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते
व्हिटॅमिन के, फोलेट, ल्युटीन आणि बीटा-कॅरोटीन यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध पालेभाज्या मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. रोज एक कप पालेभाजी शिजवून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
ॲवोकॅडोमुळे अल्झायमरचा धोका कमी होतो
ॲवोकॅडोमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अल्झायमर आजार होण्याचा धोका कमी होतो, असे अभ्यासात आढळून आले आहे.
सॅल्मन, बांगडा, ट्यूना आणि इतर मासे मेंदूचे संरक्षण करतात
सॅल्मन, बांगडा, ट्यूना आणि इतर माशांमध्ये हृदयासाठी आरोग्यदायी ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् असतात. त्यात डोकोसाहेक्साएनोइक ॲसिड (DHA) समाविष्ट आहे. त्यामुळे ते मेंदूचे संरक्षण करतात.
सूर्यफुलाच्या बिया बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात
सूर्यफुलाच्या बियांसारख्या बियांमध्ये पॉलीअनसॅचुरेटेड आणि मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्या बुद्धीचा विकास आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
मूड आणि ऊर्जा सुधारून किवी मेंदूसाठी फायदेशीर ठरते
व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने किवी मूड आणि ऊर्जा सुधारून मेंदूसाठी फायदेशीर ठरते. किवीमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि थकवा कमी होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
सफरचंदामुळे अल्झायमरचा धोका कमी होतो
सफरचंदात क्वेर्सेटिन आणि फिसेटिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात आणि अल्झायमरचा धोका कमी करतात.

