सणासुदीवेळी करा असा मेकअप, चेहऱ्यावर येईल नॅच्युरल ग्लो
Flowless Make Up Tips : प्रत्येक महिलेला नटणे फार आवडते. अशातच सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण सणासुदीला अगदी फ्लॉलेस मेकअप करायचा असल्यास कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.

त्वचा स्वच्छ आणि मॉइश्चराइज करा
मेकअपच्या आधी चेहरा नीट स्वच्छ करा. स्किन टोनप्रमाणे योग्य मॉइश्चरायझर वापरा, यामुळे मेकअप चांगला सेट होतो आणि त्वचा हायड्रेटेड राहते.
प्राइमर लावणे विसरू नका
प्राइमर लावल्याने त्वचेवरील पोअर्स लहान दिसतात आणि फाउंडेशन लवकर वितळत नाही. त्यामुळे मेकअप जास्त वेळ टिकतो.
योग्य फाउंडेशन निवडा
आपल्या त्वचेच्या टोनशी जुळणारे फाउंडेशन निवडा. हलक्या हाताने फाउंडेशन लावल्यास नैसर्गिक आणि फ्लॉलेस लूक मिळतो.
कंसीलरचा योग्य वापर करा
डार्क सर्कल्स, डाग किंवा पिंपल्स लपवण्यासाठी कंसीलर वापरा. कंसीलर ब्रश किंवा फिंगरच्या मदतीने सौम्यपणे टॅप करत लावा.
नैसर्गिक आय मेकअप करा
लाइट ब्राऊन, पिच किंवा न्यूड शेड्स वापरा. आयब्रो व्यवस्थित भरून आयलाइनरने डोळ्यांना उठाव द्या.
ब्लश आणि हायलायटर वापरा
हायलायटर गालांवर हलकासा ब्लश लावा. जेणेकरून चेहरा उजळ दिसतो.
योग्य लिपस्टिक निवडा
त्वचेला शोभेल अशी न्यूड, पिंक किंवा रेड शेडची लिपस्टिक वापरा. लिपलाइनरने आधी ओठांची रूपरेषा ठेवा आणि मग लिपस्टिक लावा.
मेकअप सेटिंग स्प्रे वापरा
शेवटी सेटिंग स्प्रे फवारा, यामुळे संपूर्ण मेकअप लॉन्ग-लास्टिंग होतो आणि फ्लॉलेस फिनिश मिळतो.

