Kitchen Hacks : स्टीलचा स्टँड काळवंडलाय? या सोप्या ट्रिकने पुन्हा चमकवा!
स्वच्छ किचन कोणाला नाही आवडत! पण भांड्यांचा स्टीलचा स्टँड जर चिकट आणि काळवंडलेला असेल, तर सगळा मूड जातो. घरातल्याच सोप्या वस्तू वापरून तुम्ही तो पुन्हा नव्यासारखा चमकवू शकता.
13

Image Credit : Social Media
मांडणी काळी का पडते?
किचनमधलं तेल, ओलावा आणि धूळ स्टँडवर जमा होते, ज्यामुळे तो चिकट होतो. त्यावर ओली भांडी ठेवल्यास, पाणी सुकल्यावर पांढरे डाग पडतात. नियमित स्वच्छता न केल्यास ही घाण वाढतच जाते.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

23
Image Credit : AI Image
लिंबू आणि मीठ
सगळ्यात आधी स्टँड पूर्ण रिकामा करा. एका वाटीत थोडं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस एकत्र करा. हा लेप ब्रशने स्टँडवर लावा, विशेषतः गंजलेल्या भागांवर जास्त लक्ष द्या. पाच मिनिटं तसंच ठेवा. मग, स्क्रबरवर डिशवॉश लिक्विड घेऊन स्टँड चांगला घासा. शेवटी, पाण्याने स्वच्छ धुऊन टाका.
33
Image Credit : pinterest
बेकिंग सोडा
स्टँडवर जास्त तेलकटपणा, धूळ किंवा पाण्याचे डाग असतील, तर बेकिंग सोडा आणि डिशवॉश लिक्विडची पेस्ट बनवा. ही पेस्ट स्टँडवर लावून थोडा वेळ ठेवा. नंतर, ब्रशने घासून पाण्याने धुवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्टँड एका फडक्याने पूर्ण कोरडा करा. थोडाही ओलावा राहिल्यास पुन्हा गंज चढू शकतो.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
