सार
थंडीच्या दिवसातील सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी किंवा अॅडव्हेंचर ट्रिपचा प्लॅन करत असाल तर गोव्याची राजधानी पणजीपासून 60 किलोमीटर दूर एक सुंदर झरा आहे. याचा नजारा पाहून त्याच्या प्रेमात नक्कीच पडाल.
Dudhsagar Falls Trip Details : थंडीच्या दिवसात एखाद्या ऑफबीट ठिकाणी फिरायला जायचे असल्यास महाराष्ट्रातील बरीच ठिकाणे आहेत. पण गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून 60 किलोमीटरवर असणाऱ्या सुंदर अशा झऱ्याला भेट देऊ शकता. खरंतर, देशातील सर्वाधिक 5 वा मोठा सर्वाधिक उंच झरा म्हणून दुधसागर आहे. याची लांबी 310 मीटर आहे.
भगवान महावीर सँक्चुअरी आणि मोलेम नॅशनल पार्कमध्ये असणाऱ्या दुधसागरचा नजारा पावसाळ्यात पाहण्याजोगा असतो. पण मान्सूनच्या काळात दूधसागर झरा पर्यटकांसाठी बंद केला जातो. मात्र थंडीच्या दिवसात अॅडव्हेंचर ट्रिप दूधसागर झऱ्याला भेट देऊ शकता.
दूधसागर येथे कसे पोहोचाल?
दूधसागर झरा पणजीपासून दूर नाही. येथे पोहचण्यासाठी पणजी येथून रोड ट्रिप करू शकता. दूधसागर पर्यंत जाण्यासाठी बाइक रेंटवर घेऊ शकता. याशिवाय गोवा आणि पश्चिम घाटांमधून जात दूधसागर झऱ्यापर्यंत पोहोचता येते. दूधसागरपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 2 किलोमीटरपर्यंतचा ट्रेक करावा लागेल.
दूधसागरचा सुंदर नजारा पाहण्यासाठी दूर-दूरवरुन पर्यटक येतात. येथे अॅडव्हेंचर गोष्टीकरण्यासह आरामात सुट्टीची मजा घेऊ शकता. दूधसागर झरा आणि आजूबाजूचा निसर्ग मंत्रमुग्ध करणारा आहे.
दूधसागरच्या आजूबाजूला भेट देण्याची ठिकाणे
- दूधसागर झऱ्याच्या आजूबाजूला काही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.
- तांबडी सुरला मंदिर- दूधसागर झऱ्यापासून 25 किलोमीटर दूर भगवान शंकराला समर्पित 12 व्या शतकातील तांबडी सुरला मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले जाते.
- डेविल्स कॅन्यन
- डेविल्स कॅन्यन देखील पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे. अॅडव्हेंचर ट्रिपसासाठी येथे भेट देऊ शकते.
- भगवान महावीर वाइल्डलाइप सँक्चुअरली
- दूधसागर झऱ्यापासून 13 किलोमीटर दूर असणाऱ्या भगवान महावीर वाइल्डलाइफ सँक्चुअरीला भेट देऊ शकता. येथे चित्ता, हरीण, हत्ती आणि विविध जातीच्या पक्षांचा नजारा पहायला मिळेल.
आणखी वाचा :
New Year 2025 : जीवन बदलण्यासाठी नवीन वर्षात करा 'हे' ८ संकल्प!
New Year: मुलांना नवीन वर्षात कोणत्या चांगल्या सवयी लावाव्यात?