MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Esophageal Cancer : गरम चहा-कॉफी पिताय? सावधान, या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो

Esophageal Cancer : गरम चहा-कॉफी पिताय? सावधान, या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो

तुम्हालाही वाफाळलेला चहा किंवा कॉफी प्यायला आवडते का? एका नव्या संशोधनानुसार, अतिगरम पेये प्यायल्याने अन्ननलिकेचे नुकसान होते आणि कॅन्सरचा धोका वाढतो.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 04 2026, 09:07 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
गरम चहा, कॉफी किंवा पाणी पिण्याची सवय तुम्हालाही आहे का?
Image Credit : Asianet News

गरम चहा, कॉफी किंवा पाणी पिण्याची सवय तुम्हालाही आहे का?

अतिगरम पेये प्यायल्याने अन्ननलिकेला हानी पोहोचते आणि कॅन्सरचा धोका वाढतो, असा इशारा एका नव्या अभ्यासात दिलाय. संशोधकांनी यूकेमधील तब्बल १० लाख लोकांवर हा अभ्यास केला. यात असं दिसलं की, जे लोक खूप गरम चहा किंवा कॉफी पितात, त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर (Esophageal cancer) होण्याची शक्यता जास्त असते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
अतिगरम पेये पिणाऱ्यांना 'अन्ननलिकेच्या कॅन्सर'चा धोका जास्त
Image Credit : Asianet News

अतिगरम पेये पिणाऱ्यांना 'अन्ननलिकेच्या कॅन्सर'चा धोका जास्त

जे लोक अतिगरम पेये पितात, त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका सामान्य तापमान असलेली पेये पिणाऱ्यांपेक्षा तीन पटीने जास्त असतो. हे गरम द्रव जेव्हा पोटात जाते, तेव्हा ते अन्ननलिकेच्या आतील पेशींचे मोठे नुकसान करते.

Related Articles

Related image1
Black Coffee Benefits : रोज ब्लॅक कॉफी पिण्याचे 7 भन्नाट फायदे, जाणून घ्या
37
गरम पेये आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचा थेट संबंध
Image Credit : Asianet News

गरम पेये आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचा थेट संबंध

चहा किंवा कॉफी थोडे कोमट होईपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला संशोधक देतात. दक्षिण अमेरिकेत लोक 'मेट' (mate) नावाचे अतिगरम हर्बल पेय पितात. तिथे झालेल्या संशोधनातही गरम पेये आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचा थेट संबंध सिद्ध झालाय, अशी माहिती संशोधक डॉ. केरेन पापीयर यांनी दिली.

47
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांचा अभ्यास
Image Credit : Asianet News

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांचा अभ्यास

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केलाय. 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर' या मासिकात हा अहवाल प्रसिद्ध झालाय. संशोधकांनी ६५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान असलेल्या पेयांना "अतिगरम" म्हटले आहे. दिवसातून सहा किंवा त्याहून अधिक वेळा अशी गरम पेये पिणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

57
मद्यपान आणि धूम्रपानामुळे कॅन्सरचा धोका वाढतो
Image Credit : Asianet News

मद्यपान आणि धूम्रपानामुळे कॅन्सरचा धोका वाढतो

अन्ननलिकेला त्रास देणाऱ्या सवयींमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. अन्न गिळताना त्रास होणे, मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD) आणि अतिगरम पेये पिण्याची सवय ही या कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत.

67
धूम्रपान आणि मद्यपान सोडल्यास कॅन्सरचा धोका कमी
Image Credit : Asianet News

धूम्रपान आणि मद्यपान सोडल्यास कॅन्सरचा धोका कमी

धूम्रपान आणि मद्यपान कमी केल्यास स्क्वामस सेल अन्ननलिकेचा कॅन्सर टाळता येऊ शकतो. छातीत जळजळ, अपचन, घसा किंवा छातीत दुखणे आणि अचानक वजन कमी होणे ही अन्ननलिकेच्या कॅन्सरची प्रमुख लक्षणे आहेत.

77
स्क्वामस सेल अन्ननलिकेचा कॅन्सर (Squamous cell oesophageal cancer) दुर्मिळ
Image Credit : Asianet News

स्क्वामस सेल अन्ननलिकेचा कॅन्सर (Squamous cell oesophageal cancer) दुर्मिळ

स्क्वामस सेल अन्ननलिकेचा कॅन्सर (Squamous cell oesophageal cancer) हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. दरवर्षी केवळ काही हजार लोकांनाच याची लागण होते. धूम्रपानासारख्या इतर सवयींमुळेही अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Earrings : फक्त 3 ग्रॅममध्ये मिळणारे सुंदर झुमके, पाहा डिझाईन्स
Recommended image2
Blood Sugar Control : शुगर कंट्रोल करायचीय? रोज ही 5 पेये पिणे टाळा
Recommended image3
Ear Chains : हे लेटेस्ट डिझाईनचे इअर चेन्स पाहून तुम्हीही म्हणाल वाव
Recommended image4
Maggi Masala : फक्त १० मिनिटांत घरीच बनवा मॅगी मसाला, पाहा सोपी पद्धत!
Recommended image5
Chanakya Niti : कुटुंबात कोणाचं ऐकावं आणि कोणाकडे दुर्लक्ष करावं? चाणक्य नीती काय सांगते?
Related Stories
Recommended image1
Black Coffee Benefits : रोज ब्लॅक कॉफी पिण्याचे 7 भन्नाट फायदे, जाणून घ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved