- Home
- lifestyle
- Diwali 2026 : दिवाळीत चुकूनही करू नका या चुका; लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवाय तर पूजा करताना घ्या 'ही' काळजी
Diwali 2026 : दिवाळीत चुकूनही करू नका या चुका; लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवाय तर पूजा करताना घ्या 'ही' काळजी
Diwali Lakshmi Pooja: दिवाळीत लक्ष्मी मातेला प्रसन्न करणं इतकं सोपं नसतं. घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती टिकावी यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

दिवाळीतील लक्ष्मीपूजन
दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण आहे. आपण सर्वजण खूप आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन मोठ्या भक्तीभावाने केलं जातं. शास्त्रानुसार या दिवशी प्रत्येक घरात लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करावी. घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून लोक दिवाळीत लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मी माता कायम आपल्या घरात वास करावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
दिवाळीच्या लक्ष्मीपूजेत कोणत्या वस्तू असाव्यात, हे आपण आधीच पाहिलं आहे. या दिवशी शंख, श्रीयंत्र, गणपती आणि कुबेर यांचीही पूजा होते. घरभर दिव्यांचा लखलखाट असतो. लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. घरात संपत्ती आणि दागदागिने वाढावेत यासाठी प्रार्थना केली जाते. पण लक्ष्मी मातेने घरात यावं असं वाटत असेल, तर पूजेच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नका. अजाणतेपणे केलेल्या चुकांमुळेही लक्ष्मी माता नाराज होऊ शकते आणि तुमच्याकडे पाठ फिरवू शकते. घरात दारिद्र्य येऊ नये आणि लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी, यासाठी या चुका टाळा.

दिवाळीच्या लक्ष्मीपूजेला 'या' गोष्टी करू नका:
स्वच्छता: लक्ष्मीपूजन सहसा संध्याकाळी होतं. त्यामुळे त्या वेळेस घराची साफसफाई करू नका. पूजेच्या दिवशी सकाळीच घर स्वच्छ करून घ्या. अस्वच्छ जागी लक्ष्मी माता वास करत नाही. त्यामुळे घराचा कोपरा न कोपरा साफ करायला विसरू नका. इकडे-तिकडे वस्तू अस्ताव्यस्त फेकू नका.
या वस्तू घरात ठेवू नका: दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करताना घरात मोडक्या-तुटलेल्या वस्तू नसाव्यात. बंद घड्याळ, रिकाम्या बाटल्या, फाटके कागद, फुटलेली काच अशा वस्तू घरात ठेवू नका. पूजेआधी घराची साफसफाई करतानाच या सर्व वस्तू फेकून द्या.
अन्न आणि कपड्यांवर लक्ष द्या
अन्नाची काळजी घ्या: फक्त घर स्वच्छ असून चालणार नाही, तर शरीरही शुद्ध असायला हवं. लक्ष्मीपूजेच्या वेळी अन्नाबाबतही खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कोणत्याही कारणास्तव मांसाहार करू नका किंवा दारू पिऊ नका. उपवास करणाऱ्यांनी कांदा आणि लसूण खाऊ नये. शक्यतो बाहेरचे पदार्थ खाणं टाळा.
पूजेच्या वेळी हे कपडे घालू नका: लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तिची पूजा करताना आपल्या कपड्यांनाही महत्त्व असतं. पूजा करताना फाटके कपडे घालू नका. फाटके कपडे हे दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं. तसेच काळ्या रंगाचे कपडेही घालू नयेत.
घरात उजेड राहू द्या: दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या दिवशी घरभर उजेड राहील याची काळजी घ्यावी. दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मी माता घरात येते आणि सर्वांना आशीर्वाद देते. पण घरात अंधार असेल तर ती आत येत नाही. त्यामुळे रात्रभर दिवे तेवत राहतील याची काळजी घ्या.