सार
Why Divorce Rate Is Increasing In India: भारतात सर्वात जास्त महत्त्व संस्कृतीला दिले जाते. शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला जन्मोजन्मीचे नाते मानले जाते. लग्न झाल्यानंतर पती–पत्नी कायमसाठी एकमेकांचे होऊन जातात. लग्नात सात जन्म एकत्र राहाण्याचे वचन पती–पत्नी एकमेकांना देतात. पण आता भारतात देखील घटस्फोटाच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. सांगायचे झाले तर, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण फार कमी आहे. पण गेल्या काही वर्षांपासून भारतात घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तर भारतात घटस्फोट होण्याची 5 सर्वात मोठी कारणे आहेत.
1. अतिशय व्यस्त जीवनशैली
आजच्या धावपळीच्या आयुष्यात पती–पत्नीमध्ये कम्यूनिकेशन गॅप वाढत आहे. जर पती–पत्नी दोघे ऑफिसमध्ये जाणारे असतील तर दोघांमधील वेळ आणि प्रोफेशनल आयुष्य एकत्र सांभांळणे कठीण होते. ज्यामुळे भावनात्मक दुरावा निर्माण होतो. अनेक गैरसमज देखील निर्माण होतात, ज्यामुळे नाते घटस्फोटापर्यंत पोहचू शकते.
2. सामाजिक विचारांमध्ये बदल
सुरुवातीला घटस्फोटाला स्वतःवर लागलेला फार मोठा डाग समजला जायचे. कारण पूर्वी घटस्फोट घेण्याचा विचार करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत होता. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. लोकं परिस्थितीचा स्वीकार शक्त तितक्या लवकर करण्यास शिकले आहेत. विशेषतः शहरी भागांमध्ये घटस्फोट आता सामान्य गोष्ट होत आहे.
3. महिला जागरूकता
गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम होण्यासाठी संधी मिळत आहे. महिला आता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. म्हणून लग्नानंतर ज्या महिलांना हवं तसं जगता येत नाही, अशात नातं घटस्फोटापर्यंत पोहोचते. शिवाय महिलांना त्यांचे हक्क देखील माहिती झाले आहेत.
4. इगो प्रॉब्लम्स
आजच्या दिवसांमध्ये पती–पत्नी दोघे स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यामध्ये इगो प्रॉब्लम्स मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. एक व्यक्ती रागात असेल तेव्हा दुसऱ्याने शांत राहिल्यास नाती अधिक काळ टिकू शकतात. पण सतत दोघांमधील इगो नात्यामध्ये येत असेल तर लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचते.
5. लव्ह मॅरिजचे वाढते प्रमाण
पूर्वी घरातल्या प्रमुख व्यक्ती लग्न ठरवायचे. म्हणून पती–पत्नीमध्ये काही मतभेद झाल्यास वाद मिटवण्याची जबाबदारी देखील घरातल्या मोठ्यांची असायची. पण आता लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे. तरुण–तरुणी आता लव्ह मॅरेजला अधिक प्राधान्य देतात. पण लग्नानतंर पाहिलेले स्वप्न पूर्ण न झाल्यास ते स्वतःच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. शिवाय कुटुंबाकडून देखील लव्ह मॅरेजला पाठिंबा मिळत नाही.
आणखी वाचा :
नाश्तासाठी पौष्टिक असे हिरव्या मुगाचे आप्पे, पाहा रेसिपी स्टेप बाय स्टेप