सार
सध्या वाढत्या उष्णेतेमुळे मधुमेही असलेल्या रुग्णांना त्रास होण्याची जास्त शक्यता आहे.त्यांना वारंवार लघवीमुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका असतोच त्यामुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत होत नाही. यासाठी जाणून घ्या सोपे उपाय.
देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येत आहे, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अति उष्णतेमुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना त्रास होतो. त्यांना वारंवार लघवीमुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका असतोच त्यामुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत होत नाही.अशा परिस्थितीत नेमके काय करावे यासाठी हे घरगुती पर्याय तुम्हाला नक्की मदत करतील.
उन्हाळ्यात साखरेची पातळी कशी राखायची ?
भरपूर पाणी प्या:
उन्हाळ्यात पाणी हा तुमचा चांगला मित्र आहे. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी पिण्याचे निश्चित करा. तसेच अति उष्णता आणि तापमान जास्त असल्यास पाण्याचे सेवन वाढावा.
हायड्रेटिंग पदार्थांचा समावेश करा:
आपल्या आहारात काकडी, टरबूज, संत्री आणि टोमॅटो यासारख्या पाण्याने समृद्ध फळे आणि भाज्यांचा समावेश करा. हे पदार्थ तुम्हाला हायड्रेटेड तर ठेवतातच पण आवश्यक पोषक तत्वे देखील देतात.
कॅफिनयुक्त पदार्थ खाऊ नका आणि पिऊ नका:
कॅफिनयुक्त कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स यापासून दूर राहा.यामुळे हायड्रेशन वाढवू शकते ज्यामुळे रक्तातील साखरेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
सुती कपडे परिधान करा:
सुती कपडे घालावे. जेणेकरून तुमचे शरीर थंड राहते. खराब तापमानाच परिणाम शरीरावर होत नाही शिवाय सनबर्न टाळण्यासाठी सनस्क्रीन वापरा.
रक्तातील साखरेचे निरीक्षण करा:
तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासत राहा आणि तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार तुमचे औषध किंवा इन्सुलिनचे डोस घेणे सुनिश्चित करा.