सार

Coconut oil in summer : उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेसंबंधित समस्या वाढू शकतात. यापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरले जातात. पण उन्हाळ्यात नारळाचे तेल लावण्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.

Coconut oil in summer : उन्हाळ्याच्या दिवसात घाम आणि कडक उन्हामुळे आपल्या त्वचेवर थेट परिणाम होतो. यामुळे त्वचा काळवंडली जात. याशिवाय चेहऱ्याचे सौंदर्य दूर होते. एवढेच नव्हे उन्हाळ्यात योग्य स्किन केअर रुटीन फॉलो न केल्यास त्वचेवर रॅशेज येणे, स्किन इचिंगची समस्या उद्भवू शकत. अशातच बहुतांशजण उन्हाळ्यात त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून सनक्रिन लावतात. पण उन्हाळ्यात नारळाचे तेल त्वचेला लावणे फायदेशीर असते असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

नारळाचे तेल लावण्याचे फायदे

त्वचा मॉइश्चराइज होते

उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांशजण त्वचेला मॉइश्चराइज करत नाहीत. पण मॉइश्चराइज लावल्याने त्वचेमध्ये ओलरसपणा टिकून राहतो. यामुळे त्वचेला फायदा होतो. अन्यथा त्वचेवर रॅशेज येणे, त्वचा लाल होणे अशी समस्या उद्भवू शकते.

लाल चट्टे येण्याची समस्या होते दूर

उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे खूप घाम येतो. यामुळे त्वचेवर लाल चट्टे येण्याची समस्या उद्भवू शकते. जर नारळाचे तेल लावल्यास रॅशेज, इचिंग किंवा रेडनेसची समस्या दूर होऊ शकते.

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव

उन्हाळ्याच्या दिवसात थेट त्वचेचा उन्हासोबत संपर्क येऊ नये याची काळजी घ्यावी. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. अशातच त्वचारोग तज्ज्ञांकडून, उन्हाळ्यात त्वचेला सनस्क्रिन लावावे असा सल्ला दिला जातो. तुम्ही नारळाचे तेल देखील लावू शकता.

पिंपल्सची समस्या होते दूर

उन्हाळ्याच्या दिवसात घाम येण्याच्या कारणास्तव त्वचेसंबंधित काही समस्या होऊ लागतात. नारळाच्या तेलाच्या मदतीने स्किन रॅशेज किंवा पिंपल्सची समस्या दूर राहू शकते. नारळाच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेमधील कोलेजन रिपेअर होत, त्वचेसंबंधित समस्या दूर होतात.

उन्हाळ्यात नारळाचे तेल लावण्याचे नुकसान

नारळाचे तेल लावल्याने त्वचेला नुकसान होत नाही. पण त्वचा तेलकट असल्यास याचा वापर करू नये. यामुळे पिंपल्सची समस्या वाढू शकते. याशिवाय नारळाचे तेल सनस्क्रिनसाठीचा पर्याय म्हणूनही लावू नये.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)