Chaitra Navratri ला आजपासून सुरूवात, घटस्थापनेसाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी

| Published : Apr 09 2024, 07:51 AM IST / Updated: Apr 10 2024, 03:21 PM IST

chaitra navratri 2023
Chaitra Navratri ला आजपासून सुरूवात, घटस्थापनेसाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी
Share this Article
 • FB
 • TW
 • Linkdin
 • Email

सार

हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. आजपासून चैत्र नवरात्रीच्या सणाला सुरूवात झाली असून 17 एप्रिलपर्यंत असणार आहे. जाणून घेऊया देवीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधीबद्दल सविस्तर...

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीला आजपासून (9 एप्रिल) सुरूवात झाली आहे. चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाणार आहे. याशिवाय आजपासून हिंदू नववर्ष (Hindu New Year) आणि गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सणही साजरा केला जात आहे.

चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून चैत्र नवरात्रीला सुरूवात होते. घटस्थापनेचा मुहूर्त आज सकाळी 6 वाजून 11 मिनिटांपासून सुरू झाला आहे. तो सकाळी 10 वाजून 23 मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करता न आल्यास तुम्ही अभिजीत मुहूर्तावरही घटनस्थापना करू शकता. अभिजीत मुहूर्त आज सकाळी 11 वाजून 57 मिनिटांपासून सुरू होणार असून दुपारी 12 वाजून 48 मिनिटांपर्यंत असणार आहे.

चैत्र नवरात्री पूजा विधी

 • आज देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाणार आहे. यामुळे सर्वप्रथम देवघरात कलशाची स्थापना करा.
 • गणपतीची पूजा करून अखंड ज्योत पेटवा.
 • देवी शैलीपुत्रीचा आवडा रंग पांढरा आहे. याशिवाय नारंगी आणि लाल रंगाचा वापर करून पूजा करू शकता.
 • आता षोडोपचार पद्धतीने देवी शैलीपुत्रीची पूजा करा. यावेळी देवी शैलीपुत्रीला कुंकू, पांढऱ्या रंगातील चंदन, पान, हळद, अक्षता, सुपारी, नारळ आणि 16 श्रृंगार अर्पण करा.
 • देवीला पांढऱ्या रंगातील फूल, मिठाईचा भोग दाखवा.
 • पूजा आणि भोग दाखवल्यानंतर देवी शैलीपुत्रीच्या बीज मंत्राचा जाप करत आरती करा.

देवी शैलीपुत्रीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र

ओम देवी शैलपुत्र्यै नमः ह्रीं शिवायै नम: वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्.
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥

चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात या देवींची केली जाणार पूजा

 • प्रतिपदा (देवी शैलीपुत्री) - 9 एप्रिल
 • द्वितीया (देवी ब्रम्हचारिणी) - 10 एप्रिल
 • तृतीया (देवी चंद्रघंटा) - 11 एप्रिल
 • चतुर्थी (देवी कुष्मांडा) - 12 एप्रिल
 • पंचमी (देवी स्कंदमाता) - 13 एप्रिल
 • पष्ठी (देवी कात्यायनी) - 14 एप्रिल
 • सप्तमी (देवी कालरात्री) - 15 एप्रिल
 • अष्टमी (देवी महागौरी) - 16 एप्रिल
 • नवमी (देवी सिद्धिदात्री) - 17 एप्रिल

आणखी वाचा : 

Gudi Padwa 2024 निमित्त मित्रपरिवाराला WhatsApp Message, Wishes, Images पाठवून करा हिंदू नववर्षाची सुरूवात

Gudi Padwa 2024 : हिंदू नववर्षानिमित्त घरच्याघरी तयार करा आम्रखंड, वाचा संपूर्ण रेसिपी सविस्तर

Gudi Padwa साठी गुढीला या 5 वेगवेगळ्या प्रकारे नेसवा साडी (Watch Video)